परफेक्ट फोडणीची खमंग बटाट्याची भाजी | साधी पण जबरदस्त चव | एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल!
Автор: Pushpa's Khamang Kitchen
Загружено: 2026-02-20
Просмотров: 72
Описание:
नमस्कार मंडळी 🙏
पुष्पांज खमंग किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे 💛
आज आपण बनवणार आहोत अगदी साधी पण जबरदस्त चविष्ट खमंग बटाट्याची भाजी.
ही भाजी पोळी, भाकरी, पुरी , मसाला डोसा साठी परफेक्ट किंवा डब्यासाठी परफेक्ट आहे. झटपट बनणारी आणि घरातील सगळ्यांना आवडणारी अशी ही रेसिपी नक्की करून बघा.
व्हिडिओ आवडला तर 👍 Like करा, Share करा आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका.
🥔 साहित्य (Ingredients)
4 बटाटे (उकडून सोललेले)
2 कांदे (बारीक चिरलेले)
4–5 हिरव्या मिरच्या (चिरलेल्या)
कढीपत्ता – 15–16 पाने
कोथिंबीर – 1 वाटी (बारीक चिरलेली)
½ लिंबाचा रस
2 टेबलस्पून तेल
½ टीस्पून उडीद डाळ
½ टीस्पून मोहरी
½ टीस्पून जिरे
चिमूटभर हिंग
¼ टीस्पून हळद
मीठ चवीप्रमाणे
1 टेबलस्पून साखर
कृती (Method)
कढईत तेल गरम करा.
त्यात मोहरी घाला, तडतडू द्या.
जिरे, उडीद डाळ घालून हलके सोनेरी होईपर्यंत परता.
हिंग, हळद, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घाला.
आता कांदा घालून तो छान गुलाबी होईपर्यंत परता.
उकडलेले बटाटे हाताने कुस्करून घाला.
मीठ आणि साखर घालून नीट मिक्स करा.
झाकण ठेवून 2–3 मिनिटे वाफ येऊ द्या.
शेवटी लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून छान हलवा.
🔥 गरमागरम खमंग बटाट्याची भाजी तयार!
🔖 हॅशटॅग्स
मराठी:
#बटाट्याचीभाजी
#खमंगभाजी
#घरगुतीचव
#झटपटरेसिपी
#महाराष्ट्रीयनरेसिपी
#साधीभाजी
#डब्यासाठीरेसिपी
#फोडणीभाजी
#पुष्पांजखमंगकिचन
#चविष्टरेसिपी
English:
#BatataBhaji
#PotatoRecipe
#IndianCooking
#QuickRecipe
#MaharashtrianFood
#HomemadeFood
#EasyCooking
#VegRecipe
#LunchRecipe
#IndianVeg
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: