ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

श्री क्षेत्र कानिफनाथ गढ बोपगाव पुणे | shri kshetra kanifnath gad pune

Автор: Umesh Mahadik

Загружено: 2021-08-05

Просмотров: 102089

Описание: #Kanifnath_Temple #कानिफनाथ_मंदिर #kanifnath_mandir

Kanifnath Temple Pune | कानिफनाथ मंदिर बोपगाव पुणे | भाग-१ -    • Видео  
Kanifnath Temple Pune | कानिफनाथ मंदिर बोपगाव पुणे | भाग-२ -    • Kanifnath Temple Pune🚩| कानिफनाथ मंदिर बोप...  

श्रीक्षेत्र कानिफनाथ गड बोपगाव पुणे.
महाराष्ट्रात शैव आणि शक्ती देवतेखालोखाल दत्तसंप्रदायाचा सर्वत्र प्रसार झालेला आहे. डोंगर दऱ्या, शिखरांच्या टोकांवर अनेक ठिकाणी अशा नाथपंथीय स्थानांची निर्मिती झाली आहे. पुण्याच्या दिवे घाटाजवळच्या डोंगरावर थाटलेले हे स्थानही यापैकी एक!

कानिफनाथ गड सह्याद्रिच्या पर्वतरांगामध्ये सासवडच्या पश्चिमेला बोपगांव येथे आहे. कानिफनाथगडावर कानिफनाथ यांचे एक प्राचिनकालीन ( सुमारे ८०० वर्षापूर्वीचे ) सुंदर मंदिर आहे. हे मंदिर ते या पंचक्रोशितील शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे.  आज आपण त्याच मंदिराला भेट देणार आहोत व त्या मंदिरासंदर्भात संपूर्ण माहिती सुद्धा घेणार आहोत.

पुण्यापासून साधारण २५ किलोमीटर अंतरावर कानिफनाथ मंदिर आहे तिकडे पोहचण्यास साधारण ४५ मिनिटांचा अवधी लागतो. पुण्याच्या दक्षिणेकडून सिंहगडची डोंगररांग खालीवर होत पूर्वेला अगदी यवतजवळच्या भूलेश्वपर्यंत पसरलेली आहे. चढ-उतारांच्या या रांगेमध्ये दिवे घाटाजवळ एक शिखर थोडेसे मान उंचावून बसले आहे. याच शिखरावर कानिफनाथ मंदिर आहे. कानिफनाथ ला जाण्या साठी पुण्यापासून २ घाट पार करावे लागतात .

पुण्याहून सासवड कडे जाताना खडी मशीन चौक मग बोपदेव घाट मार्गे  बोपगाव या गावाजव कानिफनाथ मंदिराकडे जायला एक फाटा आहे. ह्या रस्त्याच्या आजूबाजूला शेती आणि बंधारे असल्यामुळे पावसाळ्यात हा परिसर नयनरम्य दिसतो. रस्त्याच्या डाव्या बाजूला मंदिराकडे जाण्यासाठीची कमान लागते या कमानीतून किंवा या फाट्यावरून सुमारे 3-4 km पुढे गेल्यानंतर एक छोटा घाट चढून वेडी वाकडी वळणे घेत घाटरस्ता संपल्यानंतर आपण कानिफनाथ मंदिराच्या पायथ्यापर्यंत येऊन पोहचतो. घाटरस्ता संपल्यानंतर गाडी पार्किंगसाठी मोठे पटांगण आहे.

या डोंगरावरती आल्यावर दोन मंदिरे दिसतात. एक उंचावर आहे ते कानिफनाथाचे. मंदिरासाठी काही पायर्‍या चढून वर जावे लागते. थोड्या पायर्‍या चढून गेल्यानंतर नव्याने उभारलेला सभामंडप दिसतो, पंचक्रोशीतील लोकसहभागातून या मंदिराचा कायापालट झाला आहे. मुळचे मंदिर लहान आहे. मंदिर म्हणजे एक छोटी गुहा आहे, त्यात सरपटत आत शिरावे लागते. मंदिरातील गाभारा मोठा आहे. तिथला पुजारी आत शिरण्याची युक्ती सांगतो. आत शिरण्यापूर्वी शर्ट, बनियन, बेल्ट काढून आत शिरावे लागते. आतमध्ये शिरल्यावर अंधाराला डोळे सरावतात आणि थोड्याच वेळात समाधी नीट दिसू लागते. मंदिरामध्ये जाण्यासाठी दरवाजा नसून खिडकी वजा १ फुट बाय १ फुटाची चौकट आहे, या चौकटीतून कितीही जाड असलेल्या व्यक्तीला सरपटत आतमध्ये जाता येते. आतमध्ये पंधरा वीस जण मावू शकतील एवढा मोठा गाभारा आहे.आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोर दिसते ती यावनी दर्ग्या सारखी कानिफनाथांची समाधी. धूप व फुलांचा सुगंध मन प्रफुल्लीत करतो. मशिदीसारखे त्यावर एक कापड पसरलेले दिसले. ज्याप्रमाणे आतमध्ये प्रवेश केला तसेच बाहेर पडावे लागते. बाहेर येताना जसे आत शिरलो तसेच बाहेर पडता येते. मुख्य गर्भगृहात स्त्रियांना प्रवेश नाही तसेच पुरुषांसाठी सदरा व कंबरपट्टा बाहेर काढुनच आत प्रवेश करावा लागतो.

कानिफनाथाच्या या अद्भुत दर्शनातून बाहेर यावे, तो बाहेरच्या निसर्ग देखाव्यात अडकायला होते. उत्तरेकडे पुण्याचा विस्तार त्याच्या सीमा शोधा म्हणून सांगतो तर तेच दक्षिणेकडे पुरंदर-वज्रगड, सूर्य पर्वत आदी डोंगर अनंताचा पसारा घेऊन उभे राहतात. सिंहगड, कात्रज, दिवे घाट या साऱ्या ओळखीच्या खाणाखुणा दिसू लागतात. पावसाळ्यात तर या साऱ्या भूमीवर हिरवाईची दाट मखमल पसरते. मग या वेळी कात्रज-कानिफनाथ, कानिफनाथ-मस्तानी तलाव, मल्हारगड-दिवेघाट-कानिफनाथ अशा भटक्यांच्या डोंगरयात्रा सुरू होतात.

भक्तांसाठी इथे देव आहे, तर भटक्यांसाठी डोंगर. नीरव शांतता आहे, हिरवा निसर्ग आहे. सकाळ-संध्याकाळी पोहोचलात तर कधी-कधी मोरांचे बागडणेही दिसते. पुण्याजवळ एक दिवसाच्या सहल-भ्रमंतीसाठी कुठे जावे असा अनेकांना नेहमी प्रश्न पडतो. पण अशांनी आपल्या अवतीभोवतीच थोडीशी नजर फिरवली आणि शुद्ध हेतूने भरारी घेतली, तर त्यांना असे अनेक ‘कानिफनाथ’ सहज दर्शन देऊन जातील!

कानिफनाथ महाराज हे नवनाथ महाराजां पैकी एक आहेत. श्री क्षेत्र मढी, जिल्हा अहमदनगर येथे त्यांची समाधी आहे. त्यांच्या शिष्य वर्गात आवजीनाथ महाराजांचा समावेश आहे .

तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल SUBSCRIBE नसेल केला तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.

playlists :
lifestyle Vlog's | वलॉग्स :    • lifestyle Vlog's | वलॉग्स  

Travel & Entertainment Documentary's | महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे :    • Travel & Entertainment Documentary's | महा...  

Follow me on :
Instagram :   / umeshmahadik7  
Facebook :   / umeshmahadik57  

Email ID : [email protected]
Amazon shopping Link - https://amzn.to/358EqBX

#kanifnath_bopgaon #श्री_क्षेत्र_कानिफनाथ_गड #कानिफनाथ_गड #kanifnath_gad #kanifnath_temple_saswad #kanifnath_temple_vlogs #kanifnath_vlog #gadkille #महाराष्ट्रातील_प्रसिद्ध_मंदिरे #पुण्यातील_प्रसिद्ध_मंदिरे #Temple #Mandir

If you like the video, don't forget to LIKE, SHARE, SUBSCRIBE & COMMENT.

For Business Inquiries & Sponsorship
Email Id : [email protected]

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
श्री क्षेत्र कानिफनाथ गढ बोपगाव पुणे | shri kshetra kanifnath gad pune

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

आणि नाथांनी दर्शन दिले 🚩😇 | कानिफनाथ गड बोपगाव | गाथा नवनाथांची | Gatha Navnathanchi | Kanifnath gad

आणि नाथांनी दर्शन दिले 🚩😇 | कानिफनाथ गड बोपगाव | गाथा नवनाथांची | Gatha Navnathanchi | Kanifnath gad

निवडणुकीत आली मोरेंची आयटम नंबर २ | Maharashtrachi HasyaJatra

निवडणुकीत आली मोरेंची आयटम नंबर २ | Maharashtrachi HasyaJatra

आजही या आज्जी दररोज या गडावर पूजेसाठी येतात | Paayvata | Malhargad Fort, Pune

आजही या आज्जी दररोज या गडावर पूजेसाठी येतात | Paayvata | Malhargad Fort, Pune

कानिफनाथ गड मढी माहिती | मच्छिंद्रनाथ मढीतून वैतागून मायंबाला का गेले | #madhi | #kanifnath maharaj

कानिफनाथ गड मढी माहिती | मच्छिंद्रनाथ मढीतून वैतागून मायंबाला का गेले | #madhi | #kanifnath maharaj

Gahininath Samadhi Mandir 🚩 |गहिनीनाथ समाधी मंदिर🛕 चिंचोली पाटोदा ता.जि. बीड #gahininath  #beed

Gahininath Samadhi Mandir 🚩 |गहिनीनाथ समाधी मंदिर🛕 चिंचोली पाटोदा ता.जि. बीड #gahininath #beed

एक भयंकर षडयंत्र; तरी मोदी शांत का ? | Sushil Kulkarni | Analyser | Narendra Modi

एक भयंकर षडयंत्र; तरी मोदी शांत का ? | Sushil Kulkarni | Analyser | Narendra Modi

Navnath Mantra - #108 times nonstop

Navnath Mantra - #108 times nonstop

Nilkantheshwar Mandir | Pune Tourist Places | Must visit Places Pune | One Day Trip Near Pune | Pune

Nilkantheshwar Mandir | Pune Tourist Places | Must visit Places Pune | One Day Trip Near Pune | Pune

Pune Budhwar Peth: बुधवार पेठेत पोलीसांचं Combing Operation, घरांची झडती, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Pune Budhwar Peth: बुधवार पेठेत पोलीसांचं Combing Operation, घरांची झडती, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

रंगपंचमी यात्रा २०२५ बोपगाव, पुणे I Rangpanchami Yatra, Bopgaon Pune

रंगपंचमी यात्रा २०२५ बोपगाव, पुणे I Rangpanchami Yatra, Bopgaon Pune

अजित दादांचा

अजित दादांचा "गेम करणारे " शरद पवार आणि आजोबाला खोटारडा ठरवणारा नातू | Sharad Pawar | Rohit Pawar

कानिफनाथ गड 🍁(येथील मंदिरात चक्क सरपटत जावे लागते) 😳 Kanifnath Temple bopgaon Pune #vlog #kanifnath

कानिफनाथ गड 🍁(येथील मंदिरात चक्क सरपटत जावे लागते) 😳 Kanifnath Temple bopgaon Pune #vlog #kanifnath

नाथ संप्रदाय आणि करणी तंत्र | नवनाथ कोण होते? | Nath Sampraday | Gorakhnath |@nathshabarsevekari

नाथ संप्रदाय आणि करणी तंत्र | नवनाथ कोण होते? | Nath Sampraday | Gorakhnath |@nathshabarsevekari

श्री मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी मंदिर,मायंबा | येथील दर्शन  दत्तांपर्यंत पोहोचते | #machindranath

श्री मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी मंदिर,मायंबा | येथील दर्शन दत्तांपर्यंत पोहोचते | #machindranath

संजू बाबा फॅन गौर्या भाई गेला खंडणी गोळा करायला खांडेकर बिल्डर कडे | HasyaJatra | Best Comedy Clip

संजू बाबा फॅन गौर्या भाई गेला खंडणी गोळा करायला खांडेकर बिल्डर कडे | HasyaJatra | Best Comedy Clip

पुण्याचे वेरूळ भुलेश्वर l Bhuleshwar Mandir Pune | Oldest Temple of Maharashtra |Maharashtra Darshan

पुण्याचे वेरूळ भुलेश्वर l Bhuleshwar Mandir Pune | Oldest Temple of Maharashtra |Maharashtra Darshan

पुणे शहरातील सर्वात प्रसिद्ध 10 मंदिरे||Top 10 Most Famous Temples in Pune||Pune Temples

पुणे शहरातील सर्वात प्रसिद्ध 10 मंदिरे||Top 10 Most Famous Temples in Pune||Pune Temples

कानिफनाथ मंदिर गूढ गुहेत काय आहे ? का सरपटत जावे लागते ?😳 Kanifnath Temple bopgaon Pune #kanifnath

कानिफनाथ मंदिर गूढ गुहेत काय आहे ? का सरपटत जावे लागते ?😳 Kanifnath Temple bopgaon Pune #kanifnath

पुण्याजवळची अप्रसिद्ध पर्यटन स्थळे | एक वेगळा अनुभव, एक वेगळी भटकंती.......

पुण्याजवळची अप्रसिद्ध पर्यटन स्थळे | एक वेगळा अनुभव, एक वेगळी भटकंती.......

AARTI GURUDATTA ॥ मंत्रमुग्ध करणारी अप्रतिम आरती ॥

AARTI GURUDATTA ॥ मंत्रमुग्ध करणारी अप्रतिम आरती ॥

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]