त्याच्या राज्याचा शोध घे!_ New Marathi Christian Worship Song_ Brother Ashu IngOle ✝️❤️
Автор: Ashu Ingole
Загружено: 2026-02-05
Просмотров: 517
Описание:
त्याच्या राज्याचा शोध घे!_ New Marathi Christian Worship Song_ Brother Ashu IngOle 🙏🏻✝️
हे गीत बायबल वचन लूक 12.31 या वचनावर हे गीत आधारित आहे.
गीताचे बोल :- Brother Ashu IngOle ✝️❤️
गीत: "त्याच्या राज्याचा शोध घे"
चिंता जगाची कशाला करतोस, तो पाठीशी उभा आहे,
त्याच्या राज्याचा शोध घे तू, सारा आनंद तिथेच आहे...
पहिले स्थान देवाला दे तू, मग उणीव कशाची उरणार नाही,
त्याच्या कृपेची सावली जिथे, तिथे दुःख कधीही येणार नाही.
अन्न आणि वस्त्राची चिंता, कशाला बाळगतो मनी?
त्याच्या राज्याचा शोध घे, तो भरून पावेल झोळी क्षणी.
पक्षी न पेरतात, न कापतात, तरी तो त्यांना भरवतो,
तू तर लेक त्याचा प्रिय, मग तुला तो कसा विसरतो?
हो... त्याच्या राज्याचा शोध घे तू, सारा आनंद तिथेच आहे.
मिळेल तुला सर्व काही, जोवर विश्वास तुझा पक्का आहे,
त्याच्या राज्याचा मार्ग धर, तिथेच सुखाचा टक्का आहे.
उद्याची काळजी सोडून आज, तू त्याच्यासाठी जगून बघ,
देव तुझ्या पाठीशी आहे, एकदा अनुभवून तर बघ.
हो... त्याच्या राज्याचा शोध घे तू, सारा आनंद तिथेच आहे.
धावतोस कशाच्या मागे? जे आज आहे अन उद्या नाही,
देवाचा शोध घे आधी, ज्यात सर्व काही सामावले आहे.
तू मागण्याआधीच त्याला, तुझ्या गरजांची जाणीव आहे,
फक्त येशूवर श्रद्धा ठेव, बाकी सर्व काही गौण आहे.
last......
हजारो वाटा जगाच्या, पण त्याची वाट आहे खरी,
त्याचे राज्य शोधले की, सुख येईल तुझ्या दारी...
चिंता जगाची कशाला करतोस, तो पाठीशी उभा आहे,
त्याच्या राज्याचा शोध घे तू, सारा आनंद तिथेच आहे.
✝️✝️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️✝️✝️
#येशू #jesusministry #yeshugeet #yeshumasihsong #yeshuaa #yeshugeet2021 #biblehindimessage #jesuslovesministry #christianbible #biblehindimessage
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: