Kelshi Fish Market - दापोली 🦐| केळशी मासळी बाजार | जुने मच्छि मार्केट (Konkan Vlog)
Автор: S FOR SATISH
Загружено: 2020-09-03
Просмотров: 196801
Описание:
Kelshi Fish Market - दापोली 🦐| केळशी मासळी बाजार | जुने मच्छि मार्केट (Konkan Vlog) केळशी मासळी बाजार हे दापोली तालुक्यातील एक जुने फिश मार्केट आहे. केळशी बाजारपेठ सुद्धा खूप जुनी आहे इथे बरेच व्यापारी यांची दुकाने आहेत. केळशी हे आजूबाजूच्या गावांचे मुख्य बाजारपेठेचे ठिकाण आहे. केळशीमध्ये आजूबाजूच्या गावातून बरीच माणसे सामान खरेदी करण्यासाठी, राशन पाणी खरेदी करायला केळशी येथे येत असतात. सगळं सामान, वस्तू खरेदी करून झाले की माणसे मच्छि खरेदी करायला केळशीच्या मासळी बाजारात जात असतात. येथे हरणाई (हर्णे) पाजत, आडे उटंबर, बुरोंडी येथून मासे विक्री करण्यासाठी आणले जातात. केळशी मध्ये सुद्धा मासेमारी करून मासे येथे बाजारात विक्रीला आणले जातात. सध्या मासे तेवढे येत नसल्यामुळे मासे कमी आहेत परंतु बरेच मासे येथे खरेदी करता येतात. कोळंबी, बिलजा, कालवा, चडु, डोमा, सुरमई, बोंबील, वाकटी, बगी, शिंगटी असे बरेच मासे खरेदी करायला मिळतात. येथे माशांचा भाव महिला जास्त सांगतात पण भाव करून खरेदी केल्यास मासे स्वस्त कमी भावात खरेदी करता येतात. खास कोळी महिला आजी केळशी येथील दालदी समाजातील महिला मासे विक्री करायला केळशी बाजारपेठेत येत असतात. #KelshiFishMarket #FishMarketDapoli #FishMarketKonkan #sforsatish
कोकणात समुद्रालगत असलेल्या गावांमध्ये खास करून बाजारपेठा आहेत तिथे असे मासळी बाजार आपल्याला पाहायला मिळतात. कोकणात समुद्रात मासे विपुल प्रमाणात सापडतात आणि येथील लोकांच्या जेवणात माशांचे प्रमाण जास्त असते. मासे खरेदी करायला माणसे केळशी येथील फिश मार्केटमध्ये जातात. तुम्हाला या व्हिडिओमध्ये केळशी मासळी बाजार दाखवला आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा !
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: