गुहागरचा मासळी बाजार 🦐 स्वस्त मच्छि | Guhagar Fish Market - Guhagar, Ratnagiri (Konkan)
Автор: S FOR SATISH
Загружено: 2020-11-19
Просмотров: 80130
Описание:
गुहागरचा मासळी बाजार 🦐 | Guhagar Fish Market - Guhagar, Ratnagiri (Konkan) आपल्या कोकणात बऱ्याच ठिकाणी मासळी बाजार आहेत. काही फिश मार्केट हे मोठे आहेत तर काही फिश मार्केट लहान आहेत. कोकणात मासळी मोठ्या प्रमाणात सापडते. कोकणातील लोकांच्या जेवणात दररोज मासे असतात. आम्ही मित्र एकत्र येऊन आपल्या कोकणातील गुहागर मासळी बाजाराला भेट दिली होती. गुहागर मासळी बाजार हा गुहागर शहरात आहे. एसटी स्टँड पासून अगदी हाकेच्या अंतरावर हे मासळी बाजार आहे. या बाजारात सर्व प्रकारचे मासे खरेदी करता येतात. झिंगा, सुरमई, बांगडा, मांदेली, डोमा मासा, म्हाकुल, सोडे, रावस, पापलेट, हलवा असे नानाप्रकारचे मासे खरेदी करायला मिळतात. तुम्हाला येथे मासे खरेदी करून येथील लोकांकडून मासे फ्राय वा कालवण बनवून देण्याची सोय सुद्धा येथे आहे. #GuhagarFishMarket #FishMarketInKonkan #GuhagarMasaliBajar #sforsatish
आम्ही मित्र दापोली येथे फिरण्यासाठी गेलो होतो. तेथून आम्ही दाभोळ बंदरातून गुहागर येथे पोहोचलो. गुहागर मध्ये मासळी अतिशय स्वस्त आहे. पापलेट, सुरमई, हलवा, कोलंबी स्वस्त मिळतात. येथील मासे विकणाऱ्या महिला जवळच्या गावातून बाजारात मासे विकायला येतात. गुहागर अरबी समुद्राच्या किनारी वसले असल्यामुळे येथे मासे मुबलक प्रमाणात मिळतात. कधी पर्यटनासाठी फिरण्यासाठी गुहागर कोकणात याल तर या गुहागरच्या मासळी बाजाराला भेय द्यायला विसरू नका. आम्ही या बाजारातून 300 रुपयांची झिंगा घेतले. त्याचे सोडे काढून आम्ही घेऊन घरी गेलो. संध्याकाळी आणि सकाळी ताजी मच्छि समुद्र किनाऱ्यावरून गाडीने बाजारात विक्रीला आणली जाते. येथील मासे विकणाऱ्या महिला आपल्याशी मायेने बोलतात. आम्ही या बाजारात गेलो होतो त्या दिवसांपूर्वी समुद्रात वादळ आले होते. वादळ आल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मासे बाजारात कमी झालेत परंतु येथे दरदिवशी तुम्हाला मासे खरेदी करता येतात. मासे ज्या दिवशी जास्त येतात तेव्हा मासे थोडे आणखी स्वस्त असतात. तुम्हाला हा गुहागर मासळी बाजाराचा व्हिडीओ कसा वाटला व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक इन्स्टाग्रामवर फॉलो करा !
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: