कोकणातला शिमगा ( Koknatla Shimga ) होळी | माडहोळ | पालखी | संकासूर | गोमुचा खेळ - पोमेंडी, गुहागर
Автор: Amore BAE
Загружено: 2023-04-15
Просмотров: 718
Описание:
हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल.
कोकणातला शिमगा, होळी म्हणजे सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस, चाकरमानी गावी येतातच आणि गावचे ग्रामस्थ सुद्धा तेवढ्याच उत्साहाने हा सण साजरी करतात. हा गोड्या सणाचा दिवस, सानेवर माड आणला जातो.
माड म्हणजे पावित्र्याचं प्रतीक. त्यावर देवीचे निशाण (ध्वज) लावले जाते. रीतीरिवाजाप्रमाणे कधी पौर्णिमेला, कधी त्रयोदशीला तर कधी प्रतिपदेला सहानेसमोर गवताची गंजी अथवा लाकडाची गोलाकार होळी रचण्यात येते. त्याभोवती देवीची पालखी ढोल, ताशे आणि सनईच्या तालावर नाचवली जाते. पाच ते सात प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर गावचे मानकरी होळीला अग्नी देतात.
तसेच शिमग्याचे वेगवेगळे खेळही खेळले जातात.आगीतून पलायन, नारळ जिंकणे अशा स्पर्धा आजही शिमगोत्सवात भरवल्या जातात. धुलिवंदनाच्या दिवशी ओल्या मातीत लोळण घेण्याची प्रथा आजच्या काळातही सुरू आहे. शिमगा उत्सवात नृत्याचे सादरीकरण हमखास केले जाते. वेगवेगळी सोंगे धारण करून कलाकार लोकांचे मनोरंजन करताना दिसतात. काटखेळ, डेरानृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य, पुरुषमंडळीनी स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल-जवाब, शंकासुर, नकटा यांसारखी सोंगे, असे विविध प्रकार यादरम्यान सादर केले जातात. लोकनृत्याला गीताची आणि वाद्यवादनाची पूरक साथ असते. पारंपरिक वेशभूषा करून ही नृत्ये सादर केली जातात.
तुमचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे माझ्या चॅनेलचे मूल्य वाढते आहे. या बद्दल मी खुप आभारी आहे.
व्हिडिओ आवडल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा 🏹, कमेंट ✍🏻 आणि सबस्क्राईब करा 🔔 आणि तुमच्या प्रेमाचा वर्षाव Asach करत रहा❤️
असेच अधिक नवनवीन व्हिडिओ येत आहेत….
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: