Mumbai High Court चा निर्णय, Dadar चा कबूतर खाना बंद, पण जैन समाजाकडून निर्णयाला विरोध का होतोय ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-08-04
Просмотров: 22235
Описание:
#BolBhidu #KabutarKhana #JainCommunity
मुंबईतल्या दादर इथला प्रसिद्ध कबुतरखाना. हा फक्त कबूतरखाना नाही, तर मुंबईकरांसाठी एक लँडमार्क आहे. पण जवळपास ९० वर्षांचा इतिहास असलेला हा कबूतरखाना अखेर बंद करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इथं कबुतरांना खाद्य देण्यावर बंदी घालण्यात आली होती. पण तरीही काही लोक कबूतरांना खायला देत होते. अखेर २ ऑगस्टच्या रात्री उशिरा मुंबई महापालिकेकडून यावर कारवाई करण्यात आली. पालिका प्रशासनानं संपूर्ण कबुतरखाना ताडपत्रीनं झाकलाय. पण प्रशासनाच्या या कारवाईला काही स्थानिक लोकांकडून विरोधही होतोय. हा विरोध प्रामुख्यानं जैन समाजाकडून केला जातोय.
मुंबईत कबूतरखाने सुरू रहावेत यासाठी जैन समाजानं नुकतीच एक रॅली काढली होती. भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा नागरिकांच्या मागणीची दखल घेण्याची विनंती केलीय. तर दुसरीकडं यावर मनसेची प्रतिक्रिया सुद्धा आलीय. हे कबूतरखाने कसे धोकादायक आहेत, हे मनसेकडून सांगितलं जातंय. त्यामुळं या मुद्यावरून आता राजकारण व्हायलाही सुरुवात झाल्याचं पहायला मिळतंय. आता मुंबईत कबुतरांना खायला घालणं, हा तसा संवेदनशील विषय. इथं ही प्रथा शतकानुशतकं चालत आलीये. पण ही प्रथा नेमकी कधी सुरू झाली? मुंबईतल्या या कबुतरखान्याचा इतिहास काय? हा विषय इतका संवेदनशील का बनलाय? जाणून घेऊया या व्हिडिओतून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: