नाशिकच्या कामगार नगरात बिबट्याचा थरार, वन कर्मचाऱ्यावर हल्ला | Nashik Leoparad Attack
Автор: Saam TV News
Загружено: 2025-11-14
Просмотров: 39901
Описание:
नाशिक शहरातील कामगार नगर परिसरात भरदिवसा बिबट्या शिरल्याने मोठी खळबळ उडाली. एका दुकानाच्या मागे दोन बिबटे लपल्याचे नागरिकांनी सांगितल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर परिसराला जाळ्या लावून बिबट्याला पकडण्याची तयारी सुरू करण्यात आली. एका अधिकाऱ्याने एका बिबट्याच्या अस्तित्वाची पुष्टी केली असून, त्याला बेशुद्ध करून पकडण्याची कारवाई सुरू असल्याचे सांगितले. गर्दीमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते, असे आवाहनही त्यांनी केले: 'जेवढी जास्त गर्दी होईल तेवढं जास्त पॅनिक क्रिएट होईल आणि अजून जास्त हल्ले होऊ शकतात'. शोध मोहिमेदरम्यान एका वन कर्मचाऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने तो जखमी झाला. परिसरातील एका दुकानात अडकलेल्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. पारिजात नगरमध्येही दुसरा बिबट्या असल्याची माहिती मिळाल्याने तिथेही शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
#Nashik #Leopard #LeopardInNashik #KamgarNagar #ForestDepartment #RescueOperation #LeopardAttack #Maharashtra #Wildlife #HumanWildlifeConflict #ParijatNagar #NashikNews #SaamTV #MarathiNews #BreakingNews #LeopardSighting #ViralVideo
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: