मोया बसले // Moya basle
Автор: Bassein Productions
Загружено: 2026-01-23
Просмотров: 2214
Описание:
पूर्वापार सजणं-धजणं आणि साजशृंगार हे स्त्रियांच्याच आवडीचे मानलं जात असे.
पुरुषांसाठी मात्र गुळगुळीत दाढी आणि नीटनेटके चोपलेले, विंचरलेले केस—इतक्यात समाधान मानलं जाई.
आजच्या काळात मात्र चित्र बदललं आहे. सलूनमध्ये जाऊन विविध फॅशनचे केस कापणे, दाढी-मिशांना नवनवे आकार देणे हे विशेषतः तरुणांसाठी दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहे.
परंतु जुन्या काळात न्हावयाच्या हातून दाढी होणे ही केवळ गरज नव्हे, तर ती मान-सन्मान आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानली जात असे.
त्या काळी मुलांची लग्नं साधारणतः १६–१७ व्या वर्षी होत. नुकतीच दाढी-मिशा फुटू लागलेल्या त्या वयात, लग्नाच्या आदल्या दिवशी मुलाची खास दाढी केली जाई. या विधीचा मान मुलाच्या मामाला असे.
मामा गावातील उत्तम न्हावी बोलावून, मुलाला आपल्या मांडीवर बसवत आणि अत्यंत प्रेमाने त्याची दाढी केली जाई—हाच तो “मोया बसणे” हा विधी.
या प्रसंगी संपूर्ण गाव एकत्र येई. गाणी, चेष्टा-मस्करी यांमुळे वातावरण आनंदाने भारून जाई.
आपल्या मुलाची सेवा होत आहे हे पाहून आई-वडिलांच्या मनात समाधान असेच; पण न्हावयाच्या धारदार वस्तऱ्यामुळे कुठे इजा होणार नाही ना, ही हळवी चिंता देखील त्यांच्या नजरेत दाटून येई.
मंडळी, हा विधी केवळ एक परंपरा नसून अत्यंत पवित्र असा संस्कार आहे.
या विधीतून समाजातील आपुलकी, परस्पर आदर आणि नातेसंबंधांची घट्ट वीण अनुभवायला मिळते.
नवरदेवाची हजामत करणाऱ्या न्हावयाला केवळ पैशांच्या स्वरूपात मोबदला दिला जात नसे; तर सुपामधून तांदूळ, नारळ, फळे देत त्याच्या सेवेचा सन्मान अत्यंत आदरभावाने केला जाई.
या विधीतून आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला एक मोलाची शिकवण दिली आहे—
आपल्या मंगलकार्याशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मान राखावा.
कोणताही व्यवसाय लहान नसतो; प्रत्येक कष्टकरी हाताचा आदर करावा.
आणि आपल्या आनंदाच्या क्षणी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती नांदो, हीच भावना मनोमन व्यक्त करावी.
या संपूर्ण प्रसंगाचे हृदयस्पर्शी चित्रण करणारे कादोडी गीत म्हणजे— “मोया बसले”.
निवेदन व सादरीकरण:
मॅक्लिना रिबेलो आणि डॉ. रिबेका दोडती
व्हिडिओग्राफी:
रुडॉल्फ रोड्रिग्ज
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: