व्याही आल्यात ना // Vyahi alyat na
Автор: Bassein Productions
Загружено: 2026-02-06
Просмотров: 1542
Описание:
आयेज…
लग्नाच्या आदल्या दिवशी नवऱ्या मुलाकडील नातेवाईक दागिने, साड्या आणि भेटवस्तू घेऊन वधूच्या घरी येतात—या विधीला कुपारी समाजात आयेज असे म्हणतात.
या प्रसंगी व्याही मंडळी वधूच्या घरी येतात. तेव्हा नवरीकडील नातेवाईक आणि पाहुणे व्याह्यांची गमतीशीर चेष्टा-मस्करी करतात. त्यांनी आणलेल्या वस्तूंना मजेशीर नावं ठेवली जातात, आपला वधूपक्ष वरपक्षापेक्षा कसा वरचढ आहे हे हसत-खेळत सांगितलं जातं आणि सगळीकडे हास्य-विनोदाचं वातावरण पसरतं.
हे सगळं करताना त्यांची टर उडवणं किंवा अपमान करणं हा हेतू अजिबात नसतो.
उलट,वराकडील मंडळीही तेवढ्याच हसत-खेळत आपल्या पद्धतीने त्यांना उत्तर देतात. अशा रीतीने व्याही-व्याहींच्या नात्यावर आधारलेला हा एक अत्यंत सुंदर आणि आनंदी प्रसंग उलगडतो.
या आयेजाच्या प्रसंगावर आधारित आजचं आमचं सुंदर गीत —
“व्याही आल्यात डामडौलात”
निवेदन व सादरीकरण: मॅक्लिना रिबेलो व Dr. रिबेका दोडती
Videography: रुडॉल्फ रॉड्रिग्ज
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: