ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

वैदिक सणांचे योग रहस्य - भाग १०- योगिराज मनोहर हरकरे

Автор: Vaidik Vishwa

Загружено: 2026-01-01

Просмотров: 87

Описание: त्रिपुरी पौर्णिमा
पौर्णिमेला येते त्रिपुरी पौर्णिमा. या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला. हा त्रिपुरासुर कोण, कोठे राहत होता, त्याला शिवाने कसे मारले ? तीन परकोटांच्या आंत लपून बसून तेथून देवांना त्रास देणारा असा हा त्रिपुर होता. वाईट कर्म करीत असे म्हणून तो असुर होता. हे सुरअसुर वा देव दानव कोण? मुद्रा प्रकरणांत मुद्रेची महती सांगताना वर्णन केले आहे, 'मुदं ददाति देवानां द्रापयति असुरानपि'. म्हणजे साधकाच्या दैवी शक्तिंना आनंद देणारी आणि असुर शक्ति निर्मूलन करणारी ती मुद्रा. तेव्हा सुर किंवा असुर या साधकातील योग्य किंवा अयोग्य साधनावस्था होत. असा हा प्रबल त्रिपुरासुर साधकाच्या दैवी शक्तिंना त्रास द्यायचा, आणि त्रास देऊन तो आपल्या तीन परकोटांनी सुरक्षित असलेल्या पुरात लपून बसायचा. हे तीन परकोट कशाचे होते ? तर बाहेरील परकोट चांदीचा, त्या आंतील सुवर्णाचा आणि सर्वात आंतील लोहाचा होता. थोडा विचार केल्यास असे दिसून येईल की कितीही श्रीमंत माणूस असला तरी आपल्या नगरीचे बाहेरील परकोट तो चांदी सोन्याचे करणार नाही, ते परकोट शत्रू तर परस्पर लुटतीलच पण ते मजबूत नसतात. त्रिपुरासुराने असे उलट कां केले असावे ? लोखंडाचा मजबूत परकोट सर्वात बाहेरचा असावयास पाहिजे होता आणि फार फार तर आपल्या शौकाखातर आतील कोट सोन्याचा असावयास पाहिजे होता. पण त्रिपुरासुराचे सारे उलटच त्याचा सोन्याचा परकोट बाहेर तर लोहाचा आत होता. या कथा मूर्खपणाच्या धुंदीत लिहल्या की त्यात कांही रहस्य आहे?

पंचतत्वांच्या साधनानुभवाला धरून ही कथा लिहली आहे. पृथ्वितत्वाचे वर आपतत्व अनुभवायला मिळते. आपतत्वाचा वर्ण शुभ्र म्हणजे चांदीचा. साधक आपतत्वांत मुरला की त्याचा परकोट शुभ्र वर्णाच्या चांदीचा असणारच. त्रिपुरासुराच्या एका पुराचा परकोट अशा त-हेने चांदीचा होता. पण तो एक सुर नव्हता तर त्रिपुरासुर होता. त्याची तीन पुरे कोणती ? एक पुर आपतत्वाचे म्हणजे चांदीच्या परकोटांत असलेले आपल्याला गवसते. दुसरे कोणते ? आपतत्वाचे वर तेजस तत्व येते. आपतत्वांत स्थिर झालेला साधक पुढील तेजस तत्वाकरिता धडपड करतो. तेजस तत्वाचा वर्ण सुवर्णाचा आहे. तेजस् तत्वांत स्थिर झालेला साधक द्विपुरासुर बनून त्याचा दुसरा आंतील परकोट सुवर्णाचा बनणारच ! तेजस् प्राप्तीचा सुवर्ण परकोट, परंतु त्रिपुरासुर तर लोहाच्या परकोटा आंत दडला होता. हा लोह परकोट कशाचा ? तेजस् तत्वानंतर वायुतत्व येते. वायु तत्वाचा वर्ण धुम्र म्हणजे लोहाचा आहे. या वायुतत्वांत मुरणाऱ्या आणि स्थिर होणाऱ्या साधकाचा परकोट धुम्र वर्णाच्या लोहाचा नाही तर कशाचा असणार ? असा हा महाबलाढ्य त्रिपुरासुर तत्वांचा आश्रय घेऊन तेथून देवांना त्रास देत असे, यावरून साधकाला सदैव किती सावध राहावे लागते याची कल्पना येईल. वायुतत्वाची साधना म्हणजे महा कठिण कर्म ! परंतु एवढी प्रकांड साधना करणाऱ्या साधकांत सुध्दा असुर शक्ति असू शकतात. त्या आपल्यातील असुर वृत्तींचा जागृत साधकाने वध केला म्हणून आज त्रिपुरी पौर्णिमा साजरी करतात. साधकातील असर वृत्ती म्हणजे त्रिपुरासुर आणि कल्याणकारक जागृत वृत्ती म्हणजे भगवान शिव होय. शिव म्हणजे कल्याण !भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध कसा केला, तर धनुष्य बाणाने . भगवान शिवाने धनुष्य केले मेरूदण्डाचे, प्रत्यंचा म्हणजे दोरी वापरली शेषाची आणि बाण बनलेत प्रत्यक्ष भगवान विष्णू ! मेरूदण्ड म्हणजे काय हे आता आपल्याला कळले आहे. शेष म्हणजे काय हे ही कळले आहे. पण भगवान विष्णू कसे काय बाण बनलेत? भगवान श्रीविष्णू म्हणजे आकाश तत्वांतील देवता. आकाशतत्वाचे साधन म्हणजे बाण केल्याशिवाय साधक वायुतत्वाच्या लोहवर्णी परकोटाचा भेद करू शकणार नाही. वायुतत्वाचे पलीकडे आकाशतत्व आहे. म्हणून आकाश तत्वांतील भगवान श्रीविष्णू स्वतःच बाण बनलेत. भगवान शिव आपतत्वाचे स्वामी, आपतत्त्वांतील स्वामीनेच आकाश तत्वाचा बाण घेऊन मधील तिन्ही तत्वांचा परकोट करून दडणाऱ्या साधकाच्या त्या परकोटांचा विध्वंस करून त्या वृत्तिबंदिस्त असुर साधकाला त्याच्या सिध्दि शक्तिंतून आणि वृत्ती परकोटांतून बाहेर काढून त्याला मुक्त केले आणि भगवान श्रीविष्णू स्वरूप बनविले. मधील तीन तत्वांच्या मायेत सापडू नये म्हणून साधकाला आपतत्वाची साधना करतांनाच अति सावध असावे लागते. म्हणून आपतत्वाचे स्वामी भगवान शिव यांनी साधकाच्या मेरूदण्डाचे धनुष्य, त्याच्या शेष शक्तीची प्रत्यंचा आणि आकाशतत्वीय विष्णूरूपी साधनेचा बाण करून त्रिपुरासुराचा वध केला. उपनिषदे सांगतात, प्रणवो धनुः शरो ह्यात्मा ब्रम्ह तल्लक्ष्यमुच्यते । म्हणजे प्रणवसाधना धनुष्य तर आत्मरूप विष्णु हा शर आणि तो शर परब्रह्मावर मारून मुक्त व्हायचे असते. पौणिमेला पूर्ण चंद्र आपल्या शुभ्र धवल कांतीने भगवान शिवाचे आपतत्व पूर्ण विकसित करतो. कोजागिरीचा अमृत वर्षाव याही दिवशी होतो. त्यामुळे आजच्या पौर्णिमेच्या शुभ्र दिवशी शुभ साधना करणाऱ्या साधक रूपी शिवाने आकाशतत्वांतील देवतारूपी बाणांचे साहाय्य घेऊन आपल्या असुर वृत्तींचा म्हणजे त्रिपुरासुराचा वध केला.आपल्यातील प्रबल अशा असुरवृत्तिरूप त्रिपुराला मारल्यावर ज्ञानप्राप्ति होत असते. ज्ञान म्हणजे प्रकाश, म्हणून रात्री दिवे लावून किंवा मोठे मोठे काकडे लावून प्रचंड प्रकाश करतात. नदीत दीप सोडून शोभा आणतात, ज्ञानप्राप्तीचा तो उल्लास होय त्रिपुर पौर्णिमेचा उत्सव मंदिरामंदिरात मोठ्या उत्साहाने साजरा करतात. नदीकाठच्या गांवी तर आकाशातील चांदण्या जणु काय नदीत उतरून विहार करताहेत आणि नदीकांठीच्या मर्त्य जनांकडे डोळे मिचकावीत पाहून त्यांची गंमत करताहेत असे वाटते, अशी ही त्रिपुरी पौर्णिमा नदीत अवतरल्याचे दृश्य बघून निरक्षर अशा अ-कविला सुध्दा काव्य करण्याची प्रेरणा होते. नदीत चमकणाऱ्या या काजव्यांना पाहून पूर्ण चंद्राला सुध्दा आपल्या वैभवाची लाज वाटते म्हणूनच की काय तो दुसऱ्या दिवसापासून त्या मनस्तापाने कमी कमी व्हायला लागतो आणि पंधरा दिवसांनी पूर्ण रूसून बसतो. चन्द्र हा तारकांचा अधिपति ! #music #kundalini #yog

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
वैदिक सणांचे योग रहस्य - भाग १०- योगिराज मनोहर हरकरे

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Крупнейший алмаз на 228 карат добыт в России. Как выращенные кристаллы изменили рынок бриллиантов?

Крупнейший алмаз на 228 карат добыт в России. Как выращенные кристаллы изменили рынок бриллиантов?

TRZY TRAFIENIA YAMALA! LEWANDOWSKI Z GOLEM! BARCELONA - VILLARREAL, SKRÓT MECZU

TRZY TRAFIENIA YAMALA! LEWANDOWSKI Z GOLEM! BARCELONA - VILLARREAL, SKRÓT MECZU

ЛЮДИ НЕ МОГЛИ ПОСТРОИТЬ ЭТО! 9 Жутких Тайн ТИБЕТА, Которые Скрывали От Нас

ЛЮДИ НЕ МОГЛИ ПОСТРОИТЬ ЭТО! 9 Жутких Тайн ТИБЕТА, Которые Скрывали От Нас

Express Republiki 28.02.2026 | TV Republika

Express Republiki 28.02.2026 | TV Republika

"Cyniczny, barbarzyński, nieuprawniony". Generał Polko punktuje atak na Iran

Wojna W IRANIE - USA i IZRAEL uderzają

Wojna W IRANIE - USA i IZRAEL uderzają

WYBUCH W CENTRUM DUBAJU! Polacy uwięzieni na lotniskach.„Koczujemy bez pomocy konsulatu”

WYBUCH W CENTRUM DUBAJU! Polacy uwięzieni na lotniskach.„Koczujemy bez pomocy konsulatu”

Новые тайны Антарктиды раскрыты — и они лишат вас дара речи

Новые тайны Антарктиды раскрыты — и они лишат вас дара речи

Это Стоит Увидеть! Люди 100 Уровня Снятые на Камеру

Это Стоит Увидеть! Люди 100 Уровня Снятые на Камеру

Dlaczego USA i Izrael zaatakowały Iran? Atak na Iranie - co się dzieje?

Dlaczego USA i Izrael zaatakowały Iran? Atak na Iranie - co się dzieje?

Гигантский объект, в 100 раз превышающий 3I/ATLAS, только что появился — и он преследует его!

Гигантский объект, в 100 раз превышающий 3I/ATLAS, только что появился — и он преследует его!

SIKORSKI O FRAJERACH, A TUSK ODPYCHA USA? Atak na Iran z perspektywy Polski | Salonik Ziemkiewicza

SIKORSKI O FRAJERACH, A TUSK ODPYCHA USA? Atak na Iran z perspektywy Polski | Salonik Ziemkiewicza

Что Обнаружили Ученые в Антарктиде на Глубине 3000 м

Что Обнаружили Ученые в Антарктиде на Глубине 3000 м

Jak DROGÓWKA naciąga Polaków! (I jak legalnie się bronić)

Jak DROGÓWKA naciąga Polaków! (I jak legalnie się bronić)

वैदिक सणांचे योग रहस्य भाग १- योगिराज मनोहर हरकरे

वैदिक सणांचे योग रहस्य भाग १- योगिराज मनोहर हरकरे

संगीत ते समाधी - भाग १०- योगिराज मनोहर हरकरे#music

संगीत ते समाधी - भाग १०- योगिराज मनोहर हरकरे#music

स्वरशास्त्र व दीपक राग - संगीत ते समाधी भाग १२ - योगिराज मनोहर हरकरे#music

स्वरशास्त्र व दीपक राग - संगीत ते समाधी भाग १२ - योगिराज मनोहर हरकरे#music

МЫ СЛЕДУЮЩИЕ: Последнее ПРЕДУПРЕЖДЕНИЕ Жака Кусто из Марианской впадины!

МЫ СЛЕДУЮЩИЕ: Последнее ПРЕДУПРЕЖДЕНИЕ Жака Кусто из Марианской впадины!

वैदिक सणांचे योगरहस्य - भाग- ९- योगिराज मनोहर हरकरे#yog

वैदिक सणांचे योगरहस्य - भाग- ९- योगिराज मनोहर हरकरे#yog

Как изменили прошлое? Самые странные случаи эффекта Манделы

Как изменили прошлое? Самые странные случаи эффекта Манделы

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]