स्वरशास्त्र व दीपक राग - संगीत ते समाधी भाग १२ - योगिराज मनोहर हरकरे
Автор: Vaidik Vishwa
Загружено: 2026-01-31
Просмотров: 134
Описание:
स्वरशास्त्र आणि स्वरोदयशास्त्र
स्वर म्हटले की आमच्यासमोर साधारणतः ‘सा, रे, ग, म, प, ध, नी’ हेच स्वर येतात. त्यातील चित्रविचित्र स्वररचना म्हणजे आमचे स्वरशास्त्र होय. परंतु आमच्या असल्या स्वरशास्त्राचा विलास आज तरी केवळ षड्जग्रामापुरताच मर्यादित आहे. गंधारग्राम गंधर्वांसह आणि मध्यमग्राम देवांसह लोप पावला आहे. त्यातील स्वरशास्त्रांचे आम्हाला आज तरी मुळीच ज्ञान नाही. राजा विक्रमादित्याच्या दीपक रागाबद्दल आम्ही बरेच ऐकतो. अकबर बादशहाच्या दरबारात स्वतःला सेवा रुजू
करण्याकरीता मुसलमानत्व पत्करुन मोठा झालेला लाडका गायक मियाँ तानसेन आमचा गायनादर्श होय. त्यांच्याही दीपक रागाबद्दल आम्ही ऐकतो व ते सर्व खरे मानून त्यावर ग्रंथ रचतो व चित्रपटही तयार करतो. परंतु या दीपक रागाचे स्वरुप काय? तो कसा गावा? गाण्यापूर्वी तो कसा सिद्ध करावा? त्याकरीता गायकाच्या जडसूक्ष्म शरीराची अवस्था काय असावी लागते याबद्दल आम्हाला अणुस्फोटाइतकेच ज्ञान आहे. तरीपण आम्ही मियाँ तानसेनाची तोंडभर स्तुती करतो व त्याने दीपक राग म्हणून दिवे लावलेत असे मनोमय मानतो व धन्य होतो.
राजा विक्रमादित्याबद्दल असे वर्णन आहे की त्याला हातापायाने थोटा केल्यावर एका तेल्याला त्याची दया येऊन त्याने त्याला आपल्या तेलघाणीवर धोंड्याऐवजी वजन म्हणून बसविण्याकरीता पोसले. तेलघाणी चालू झाली. रात्र झाली. तेलघाणीचा कर्र - कर्र आवाज चालू होताच. राजा विक्रमादित्य आपल्या पूर्व जीवनाचा चित्रपट पाहात होता. आता तर तो हातपाय तोडलेला एक अपंग मांसगोळा बनला होता. तेलघाणीवर बसून-बसून
तो थकला. रात्र झाली. त्याच्या मुखातून संगीताचे स्वर बाहेर पडू लागले. जीवन अतिशय दुःखमय व अवहेलनेने परिपूर्ण असताना राजा विक्रमादित्याच्या गळ्यातून श्री किंवा मारुहसारखे रागाचे स्वर निघायला पाहिजे होते. परंतु विधियोग निराळाच होता. राजा विक्रमादित्याच्या गळ्यातून सूर निघू लागले. सर्व शहरात जागोजागी अवकाशात ज्योती पाजळू लागल्या. काय चमत्कार हा ! कोणाच्या तपोबलाने ह्या ज्योती चमकताहेत ? नागरिक शोध घेऊ लागले. पण बरेच गायक ठायी-ठायी गायन करीत होते. कित्येकांना वाटले की आपल्याच गायनाने हे दिवे लागले आहेत. गायकांचे गायन बंद पडले पण ज्योती प्रखरच होत होत्या. याचा अर्थ इतरजनांच्या गायनाने हे दिवे लागले नव्हते. कोण हा महात्मा असावा की ज्याच्या तपोबलाने या शतज्योती पाजळल्या? उत्सुक जन गावात फिरायला लागले. तेल्याच्या घाणीवर एक हातपाय तोडलेला जीवंत गोळा गाणे म्हणत होता. इतरांना विचित्र व बेसूर वाटणारे ते गाणे ! त्यात रस नाही की स्वर नाहीत. रसहीन व बेसूर गाणे. आणि गाणारा कोण ? तर इतरांना वाटणारा एक अट्टल बदमाष की ज्याने राजकुमारीचा कंठा चोरला म्हणून राजाने त्याचे हातपाय तोडले होते !लोक त्याला वेडावू लागले. ‘ए थोटया, शहरात चमत्कार होत आहेत. अधांतरी दिवे लागत आहेत, भलत्या वेळेस हे काय वेडेवाकडे गाणे म्हणतोस. बंद कर तुझे रडणे’ राजा विक्रमादित्य भानावर आला. उत्तर देण्याकरीता त्याने गाणे बंद केले. तो काय ! साऱ्या दीपज्योती निमाल्या. ‘शतसूर्य मालिकांच्या दीपावली निमाल्या’ काय? या थोट्याच्या, बदमाषाच्या गायनाने या दीपज्योती पाजळल्या होत्या?' तेली गहिवरला, राजा धावत आला. सारे पौरजन विस्मयाने व आदराने नतमस्मक झाले. तो खरोखरीच राजा विक्रमादित्य होता. दीप रागाच्या गायनाने राजा विक्रमादित्याच्या अंगाचा विलक्षण तर नव्हेच पण साधा दाह सुद्धा झाला नव्हता. तो दाह शांत करण्याकरीता त्याला कोणत्या राजकुमारीच्या मेघ रागाची आवश्यकता नव्हती. मियाँ तानसेनने दीपक राग गायिला, पण त्यात त्याच्या देहाचा अतिशय दाह झाला. तो दाह त्याच्या कोण्या प्रेयसीने मेघ राग गाऊन पर्जन्याने शांत केला असे म्हणतात. राजा विक्रमादित्याचा दीपक राग गायनाने अंगाचा मुळीच दाह झाला नाही. लेखकाचाही असाच स्वतःचा थोडा अनुभव आहे. मग राजा विक्रमादित्याचा दीपक राग कोणता? तो खरा की खोटा?
मियाँ तानसेनाचा दीपक राग तर आम्ही खोटा मानायला तयार नाही, कारण तो शहेनशहा अकबर बादशहाच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होता. राग खोटा म्हणावा तर दोघांनीही दिवे लावून दाखविले होते. मग रागस्वर किंवा साधन प्रक्रिया किंवा शरीर शुद्धतेत कांही फरक होता काय? साध्या तांब्याच्या तारेतून वीज चटकन निघून जाते, पण तीच वीज टंगस्टन धातूच्या तारेतून धाडली असल्यास विजेच्या प्रवाहाला गतिरोध होऊन त्यातून प्रखर उष्णता उत्पन्न होते आणि त्या प्रखर उष्णतानिरोधातून प्रकाश प्रकाशू लागतो. विजेचे बल्ब ही त्याच विद्युतप्रवाहाला विरोध झाल्याची फलनिष्पत्ती होय. असला प्रकार तर नसेल ना मियाँजीच्या गायन प्रकारात वा शरीररचनेत? काय खरे मानावे? राग खरा की गायकाचे शरीर खोटे?
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: