संगीत ते समाधी - भाग १०- योगिराज मनोहर हरकरे
Автор: Vaidik Vishwa
Загружено: 2026-01-09
Просмотров: 110
Описание:
स्वरांचे पंचगुणात्मक स्वरूप
पाश्चात्त्य संगीत जगतात पुन्हा एक प्रयोग चालू आहे. विशिष्ट कंपनांचा भडिमार केल्यावर पेय पदार्थाची चव बदलते तर नसलेली नवीन उत्पन्न होते. म्हणजे भारतीय सांख्यदर्शनानुसार पाश्चात्त्यांचे संगीत प्रयोग आपतत्वापर्यंत आले आहेत. आपतत्वाचा गुण, रस व चव हा आहे. पाश्चात्त्य जगाने आता स्वरांना नाद, रंग व चव हे गुण दिले आहेत. राहिले स्पर्श व गंध गुण. स्पर्श गुण वायुतत्वाचा तर गंध गुण पृथ्वितत्वाचा आहे.
स्पर्श व गंध हे दोन गुण संगीतातील स्वरांना प्राप्त झाल्यास व गायक शास्त्रीय पद्धतीने गायन करीत असल्यास गायकासमोर व तत्सम श्रोत्यांसमोर त्या-त्या रंगविषयाला धरुन विश्वामित्रांसारखे एक नवीन प्रत्यक्ष जगच उत्पन्न होईल यात शंका नाही. स्पर्श गुण, प्रकाश संवेदनेपेक्षा अधिक सूक्ष्म असल्याने जोपर्यंत प्रकाशवेगाच्या वर वेग प्राप्त होऊ शकत नाही, तोपर्यंत पाश्चात्य जगाला स्वरांना स्पर्श गुण देता येणार नाही. त्याकरीता आज योगशास्त्र हा एकमेव भारतीय पर्याय आहे. पण आम्हाला तर योग इत्यादीचे थोतांड मुळीच नको. मग स्पर्शगुण कसा प्राप्त होणार? जोपर्यंत पाश्चात्त्य प्रकाशवेगाच्या वर वेग प्राप्त करु शकत नाहीत, तोपर्यंत आमच्या सारख्या परावलंबी भारतीयांना स्वरांचा स्पर्शगुण अनुभविण्याकरीता वाट पहावी लागेल. सद्बुद्धी सुचलीच तर आजही योगशास्त्रासारखा सर्व शास्त्रांचा राजा आम्हाला सर्व ज्ञान प्राप्त करुन देण्यास तयार आहे.
वस्तुनिष्ठ ज्ञान प्राप्त करण्याचे पाश्चात्त्यांचे प्रयत्न कितीही स्तुत्य असले तरी आजचे विज्ञान वस्तुनिष्ठ घटनांनाच धरुन जोपर्यंत राहील, तोपर्यंत विज्ञानाचा वेग प्रकाश वेगाच्या वर जाणारच नाही. वस्तु घटना प्रकाशाच्या द्वारेच प्राप्त होऊ शकते. प्रकाश अवगुंठित झाला म्हणजे वस्तुघटना प्राप्त होत असते. अवगुंठित प्रकाशाला पदार्थ विज्ञानात बॉटल्डवेव्हज् म्हणतात. असल्या बॉटल्डवेव्हज् मधून ओत प्रोत (इलेक्ट्रॉन-प्रोटॉन) साकारतात. ओत-प्रोतांच्या गती सापेक्षतेतून परमाणू भासमान होतात. परमाणूंच्या आकर्षण संचातून अणू तयार होतात. अणूंच्या संभारातून वस्तू किंवा पदार्थ साकारतात.अशी ही घटनामालिका आहे. म्हणजे वस्तुघटनाच मुळी प्रकाशावर म्हणजे पर्यायाने प्रकाशवेगावर अवलंबून असल्याने, प्रकाशवेगाच्या वर जाणे कोणत्याही उपकरणाला अशक्य आहे. कारण उपकरणांच्या द्वारेच प्रयोग केले जात असल्याने उपकरणांच्या परमाणूंतील ओतप्रोतांचा वेग त्यांना आपोआप आलाच म्हणून ओतप्रोतांचा प्रकाशवेग जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत प्रकाशवेगाच्या वर असलेला वायूचा स्पर्शगुण उपकरण यंत्रांच्या द्वारे उत्पन्न करणे कठीणच आहे. त्याकरीता घटनावेगाच्या वर असलेला म्हणजे प्रकाशवेगाच्या वर असलेला वेग धारण करावा लागेल. असला परमोच्च वेग म्हणजे वायूतत्वाचा. सर्वस्थित, सर्वकालीय परंतु एकस्थानीय व एककालीय असा वेग होय. असला सर्वस्थित आवेग केवळ मानवी चित्तच संपादन करु शकते, अनुभवू शकते. साध्या उपकरणांच्या आवाक्याबाहेरील ही गोष्ट आहे. चित्ताला हा असला अनुभव येण्याकरीता त्या चित्तावर योगमार्गाच्या द्वारे सतत संस्कार करावे लागतील. एवम् वायुतत्वाच्या स्पर्शगुणाचा साक्षात्कार करण्याकरीता योगमार्गाची कास धरावीच लागते.
लेखक - योगिराज मनोहर हरकरे
#kundalini #music #yog
@vaidikvishwa2462
@ashokg21624
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: