शिवार भ्रमंती… अनुभवांची शाळा
Автор: आनंदाचं झाड
Загружено: 2026-03-10
Просмотров: 1
Описание:
शिवार भ्रमंती… अनुभवांची शाळा
आज शिवार भ्रमंती दरम्यान लेकरांना निसर्गाची एक वेगळीच ओळख झाली. शेताच्या कडेला उभे असलेले अनेक वृक्ष, वेली, झुडपे त्यांनी बारकाईने पाहिले. प्रत्येक झाडाकडे पाहताना त्यांची उत्सुकता वाढत होती.
“गुरुजी, हे कोणतं झाड?”
“याचा उपयोग कशासाठी होतो?”
असे प्रश्न विचारत विचारत लेकरं स्वतःच त्यांची नावे आणि उपयोग सांगू लागली. पुस्तकात वाचलेलं ज्ञान आज प्रत्यक्ष निसर्गात अनुभवताना त्यांच्या डोळ्यांत आनंद चमकत होता.
इतक्यात कुणाच्या तरी नजरेला बिबवा या वृक्षाची फळं दिसली. मग काय… लेकरांनी ती फळं वेचली आणि चवीने खाऊ लागले. त्या क्षणी झालेला आमचा संवाद खूप निरागस आणि आनंद देणारा होता.
निसर्ग हीच खरी शाळा आहे.
पुस्तकाबरोबरच शिवारात फिरताना मिळणारे अनुभव लेकरांच्या मनात कायमचे साठून राहतात. अशा छोट्या छोट्या अनुभवांतूनच त्यांच्या ज्ञानाची आणि संवेदनांची खरी वाढ होत असते.
#शिवारभ्रमंती
#निसर्गातूनशिक्षण
#विद्यार्थीअनुभव
#आनंदाचेशिक्षण
#ग्रामिणशाळा
#शिकतअसलेलीलेकरं
#Education
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: