“नदीष्ट : लेकरांच्या मनात वाहणारी विचारांची नदी!”
Автор: आनंदाचं झाड
Загружено: 2026-03-14
Просмотров: 29
Описание:
“नदीष्ट : लेकरांच्या मनात वाहणारी विचारांची नदी!”
काल आमच्या शाळेतील वाचनाच्या आनंद सोहळ्यात एक विलक्षण क्षण अनुभवायला मिळाला.
नदीष्ट या मनोज बोरगावकर लिखित अप्रतिम अक्षरलेण्याचे आम्ही पुन्हा एकदा वाचन पूर्ण केले.
विशेष म्हणजे या ग्रंथाचे आमच्याकडून तिसऱ्यांदा पारायण झाले!
आणि प्रत्येक वेळी या पुस्तकातून आम्हाला नवे विचार, नवे जीवनमूल्य आणि जगण्याची नवी दृष्टी मिळाली.
अनेकांना वाटते की हे पुस्तक लहान मुलांसाठी नाही…
पण आमच्या लेकरांनी हा गैरसमज अक्षरशः फाटा देऊन टाकला.
पुस्तक संपल्यावर वर्गात जणू खळखळत्या झऱ्यासारखा विचारांचा प्रवाह वाहू लागला.
प्रत्येक लेकरू या पुस्तकावर मनापासून बोलत होतं.
कोणी पात्रांवर बोललं…
कोणी त्यातून मिळालेल्या मूल्यांवर बोललं…
तर कोणी स्वतःच्या आयुष्याशी त्याची सांगड घालत होतं.
या सगळ्यातील सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे
लेकरांनी थेट लेखक मनोज बोरगावकर यांच्याशी दिलखुलास संवाद साधला.
लेखक आणि वाचक यांच्यातील हा जिवंत पूल पाहताना मन अक्षरशः आनंदाने भरून आलं.
असं वाटलं —
पुस्तक म्हणजे फक्त अक्षरांचा संच नसतो,
ते विचारांची नदी असते…
आणि ती जेव्हा बालमनातून वाहते, तेव्हा समाज समृद्ध होतो.
#वाचनसंस्कार
#नदीष्ट
#मनोजबोरगावकर
#बालवाचन
#वाचनसंस्कृती
#शिक्षणगूज
#ग्रंथप्रेम
#ZPSchool
#TeacherLife
#EducationMatters
#आनंदाचंझाड
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: