पुणेरी दडपे पोहे | सोपे, चवदार, झटपट, वेगळे, कुरकुरीत पोहे, ब्रेकफास्ट, स्ट्रीटफूड, पुणे
Автор: Sugran Seema
Загружено: 2025-04-19
Просмотров: 140709
Описание:
साहित्य
२वाटया भाजलेले पोहे
१/२ वाटी. नारळ पाणी
१/२ चमचा. मीठ
१ चमचा. राई, जिरे
१/२ चमचा. हींग
८,१० कडीपत्ता पानं
२,३ हीरवी मिरची
१ वाटी. कोथिंबीर
१ वाटी. कीसलेलं ओलं खोबरं
१/२ लिंबू
१ वाटी बारीक चिरलेला कांदा
१/४ चमचा. हळद
१/२ चमचा. पिठी साखर
१/२ वाटी. तळलेले शेंगदाणे
१/२ वाटी. तेल
२चमचे. फरसाण
२. पोह्यांचे पापड
कृती
प्रथम मध्यम गॅसवर कढईत पोहे कुरकुरीत करून घ्या. फोडणीच्या पॅनमध्ये ४ चमचे तेल घालून ते चांगले गरम झाले की त्यात शेंगदाणे घाला. त्यात पाव चमचा मीठ घालून शेंगदाणे कुरकुरीत तळून घ्या.ते प्लेट मध्ये काढा आणि त्याच पॅनमध्ये राई, जिरे हिंग हळद मिरची कडीपत्ता घालून खमंग फोडणी करा . ती थंड करत ठेवा. आता परातीत पोहे घालून त्यात कांदा खोबरं कोथिंबीर घालून चांगले ढवळा.तयात तळलेले शेंगदाणे, फोडणी, घालून चांगले ढवळा.तयात नारळ पाण्याचा हबका मारा.आणि झाकण आणि त्यावर जड वस्तू ठेवून पोहे दडपा. दडपलेले ओलसर पोहे प्लेट मध्ये काढा आणि त्यावर पून्हा कांदा, खोबरं, कोथिंबीर फरसाण,शेव घाला आणि सोबत दोन तळलेले पोह्याचे पापड ठेवा. पुणेरी दडपे पोहे तयार आहेत.
#पोहे #दडपे #चवदार #व्हायरल #पोटभरू #झटपट #सोपी #पुणे #पुणेरी #स्ट्रीट फुड#पॉपयुलर#वेगळे #कुरकुरीत #ब्रेकफास्ट #viralvideo #viral #easyrecipe #indianfood #instant #pune #streetfood #popular #different #sugran #sugranseema #riceflex #सुगरण #सुगरणसीमा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: