संध्याकाळचं खाणं, भरली चपाती | खरपूस, कुरकुरीत, पोटभरू, तृप्ती, चवदार,भरली चपाती
Автор: Sugran Seema
Загружено: 2025-01-11
Просмотров: 263390
Описание:
साहित्य:
४ उकडलेले. बटाटे
१/२ चमचा. आलं लसूण पेस्ट
१/४ चमचा. आमचूर पावडर
१/२चमचा. लाल तिखट
२ चमचे तेल
१/२ चमचा. मीठ
१/२ वाटी. चिज
१/४वाटी. बटर
४. चपात्या
१/२ वाटी. हीरवी चटणी
१/२वाटी. सॉस
१वाटी. कांदा,काकडी,ढोबळी मिरचीचे तुकडे
२चमचे. चाट मसाला
१/२ वाटी. कीसलेला कोबी
कृती:
प्रथम बटाटे सोलून त्याचे तुकडे करून घ्या. मध्यम गॅसवर कढईत तेल घालून चांगले गरम झाले की त्यात हींग,आलं लसूण भरड,बटाटे घालून चांगले परतून घ्या. नंतर त्यात हळद, लाल तिखट, आमचूर पावडर, मीठ घालून चांगले परतून घ्या आणि झाकण ठेवून एक वाफ काढा. वरुन कोथिंबीर घालून गॅस बंद करा.दोन ,तीन चपात्या कीवा मोठे फुलके करा. एक फुलका पोळपाटावर घेऊन त्यावर बटर पसरा. नंतर सुरीने मध्यापासून टोकापर्यंत फुलका कापून घ्या. आता कांदा, ढोबळी, आणि काकडीच्या फोडींवर चाट मसाला भुरभुरा. एका त्रीकोणावर थोडी चटणी पसरा आणि त्यावर कांदा, काकडी, ढोबळीचे तुकडे ठेवा.दुसरया त्रिकोणावर सॉस पसरा आणि त्यावर बटाट्याच्या फोडी ठेवा. आता पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणावर दाबून ठेवा. आता तिसऱ्या त्रिकोणावर चटणी पसरा आणि त्यावर कोबीचा कीस ठेवा आणि त्यावर चाट मसाला भुरभुरा. नंतर आधीच्या घड्या तिसऱ्या त्रिकोणावर दाबून ठेवा. नंतर चौथ्या त्रिकोणावर सॉस पसरा आणि त्यावर भरपूर चीज किसून ठेवा आणि आधीचे तीन त्रिकोण त्यावर दाबून बसवा.
आता गॅस वर मध्यम आचेवर तवा ठेवून त्यावर बटर लावून त्यावर तयार केलेली भरली चपाती ठेवा. आणि दोन्ही बाजूंनी पुन्हा बटर लावून खरपूस भाजून घ्या. सॉस आणि हीरवी चटणी बरोबर भरली चपाती गरम असतानाच सर्व्ह करा...
#चपाती #कुरकुरीत #खुसखुशीत #खाणं #व्हायरल #छोटीभुक #पोटभरू #रुचकर #चवदार #तृप्तजिभ #फुलका #रोटी #मराठी #chapati #crunchy #smallhunger #viralvideo #viral #roti #fulkaroti #eveningsnacks #tasty #simple #digestivehealth #खरपुस
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: