Appasaheb Dharmadhikari यांना Maharashtra Bhushan दिल्यानंतर वाद, महाराष्ट्रभूषण वादात का सापडत आलाय
Автор: BolBhidu
Загружено: 2023-04-17
Просмотров: 304776
Описание:
#BolBhidu #AppasahebDharmadhikari #EknathShinde
ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यासाठी मुंबईतल्या खारघर मैदानावर लाखो लोकांची गर्दी होती, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातल्या अनेक आमदार-खासदारांची सोहळ्याला उपस्थिती होती. मात्र या सोहळ्याला गालबोट लागलं, ते ११ लोकांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे. भरदुपारी सुरु झालेल्या या कार्यक्रमावेळी तापमानानं ४० डिग्रीचा टप्पा ओलांडला आणि त्यामुळं अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला.
यात ११ जणांना जीव गमवावा लागला, तर २४ जणांवर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर कार्यक्रम बंदिस्त सभागृहात का आयोजित केला नाही ? ऐन दुपारची वेळ का निवडण्यात आली ? अशी टीका करत विरोधकांनी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आणि वादाला तोंड फुटलं. पण महाराष्ट्र भूषण आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही, याआधी कुठल्या पुरस्कारांवेळी वाद झाले होते ? त्या घटना काय होत्या ? तेच या व्हिडीओमधून पाहुयात.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: