Rajgad Fort Trek I राजगड महाराष्ट्रातील सर्वांत सुंदर किल्ला
Автор: Bhatkanti ekdhyas -भटकंती एक ध्यास
Загружено: 2025-09-15
Просмотров: 127
Описание:
राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. राजगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील, राजगड तालुक्यात व भोर गावाच्या वायव्येला
२४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे. दुर्गराज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो, तर किल्ले रायगड हा शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो. राजगडाच्या मध्यवर्ती ठिकाणी उंच डोंगर तासून तयार केलेला बालेकिल्ला म्हणजे पृथ्वीने स्वर्गावर केलेली स्वारी होय.
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: