गीत - गडावरची कळसूआई [ Gadavarchi kalsuaai ] गीतकार - जगन खोकले l गायक - विक्रम कवटे
Автор: Jagan khokale
Загружено: 2022-01-15
Просмотров: 209466
Описание:
आदिवासी संस्कृती संवर्धन मंडळ इगतपुरी प्रस्तुत,
गीतकार - जगन खोकले
गायक - विक्रम कवटे
विशेष सहकार्य - बाळू भांडकोळी
संगीत संयोजक - डि.जे. भुषण, विलास डावखर, रोशन भिसे
प्रोत्साहन - रामदास जाधव
गडावरची कळसूआई...गीत क्र ४
गडावरची कळसूआई
पाचव्या माळीला जायाची घाई
गडावरची कळसूआई
शिखरावरुन वाट ती पाही
कळसूआय धाव लवकरी
येऊ दे गडावरी...!!धृ!!
आदिवासींची कुलचिन्ह तु
आमची श्रद्धा तुझ्यावरी
महाराष्ट्राची शिखर स्वामिनी
ठेव नजर आम्हावरी
चहूबाजूंनी कडेकपारी
शिडी लावली वरचेवरी
कळसूआय धाव लवकरी
येऊ दे गडावरी...!!१!!
चाईचा मोहर कोळूची भाजी
आळवा तोरणा लय हो भारी
घोडी गडद कुरुंग किल्ला
घाटावरची सांदणदरी
खडकेद इंदोरे आंबेवाडी
घाटघर चिचोंडी मुरशेत बारी
कळसूआय धाव लवकरी
येऊ दे गडावरी...!!२!!
कोल्हा सायाळ वानर ससा
ढाण्या वाघाची भिती मनी
मोर लांडोर कुंभार कुकडा
रानपाखरं गाती गाणी
पांगारा सादडा बोंडारा सायरी
तीवस चिल्लार जांबळी बोरी
कळसूआय धाव लवकरी
येऊ दे गडावरी...!!३!!
बाळू भांडकोळी देई आरोळी
धाऊन ये गं संकट काळी
जोडीनं येईल पाचव्या माळी
घेऊन बांगडी कुंकु चोळी
गीत लिहीतो जगन खोकले
नतमस्तक आईच्या पायी
कळसूआय धाव लवकरी
येऊ दे गडावरी...!!४!!
गीतकार...!
आदि-जगन सिताराम खोकले
रा.सोमज ता.इगतपूरी जि.नाशिक
मो. 97 65 45 73 62
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: