AAGADWADI DAGADWADI /आगडवाडी दगडवाडी/ VIKRAM KAWATE/JAGAN KHOKLE / विक्रम कवटे,जगन खोकले
Автор: vikram kawate
Загружено: 2023-04-17
Просмотров: 2328062
Описание:
गायक
विक्रम कवटे
पुनर्लेखन
जगन खोकले
रेकॉर्डिंग
डीजे कार्तिक गंभीरे
संगीत
विक्रम कवटे
मार्गदर्शक
एकनाथ बगाड
सहकार्य
रोशन भिसे,जालिंदर गभाले
संजय खोकले
कलाकार
रामदास बोराडे ,रखमा कवटे,
यशोदा कवटे,रुख्मिणी खोकले, भागीरथ कुंदे
सह कलाकर...
गणेश पाडेकर,बाळू उबाळे
तनश्री कुंदे,मानसी कुंदे,अंजली कुंदे,
वेशभूषा...
रोशनी खोकले, दिपीका कुंदे,माया कुंदे, हिराबाई खोकले
व्हिडिओ
विक्रम कवटे
**************************************
आगडवाडी दगडवाडी
आगडवाडी दगडवाडी
बाळा हीच काय रे सासरवाडी
बाळा हीच काय रे सासरवाडी...!!धृ!!
पोर पह्या तुझा तात्या गेला
त्यानी मला संगा नाय रं नेला
कोणा ठाऊक हे डोंगरात चुकला
त्यानी तुझ्यासाठी काय रे देखला
कुयकं पयली त्यानी महालमाडी
बाळा हीच काय रे सासरवाडी
बाळा हिच काय रे सासरवाडी...!!१!!
जायला यायला हा मोघाम घाटं
बैलगाडीला धडाची नाय रं वाटं
साऱ्या रसत्यातून हे दगड गोटं
ठेचून निंघालय माझं उरन पोटं
आदळून आपटून गेली बरगाडी
बाळा हिच काय रे सासरवाडी
बाळा हिच काय रे सासरवाडी...!!२!!
मी उतरुन चलू म्हणते पाई पाई
पण उन्हाची झाली रे लाही लाही
पार घशाला पडलेय कोरड बाई
इढं झुरडात प्यायला पाणी नाही
चहूबाजूनी दिसतेय डोंगर झाडी
बाळा हिच काय रे सासरवाडी
बाळा हिच काय रे सासरवाडी...!!३!!
माथ्यावर किती रे गार गार हवा
इढं खायाला मिळतोया रान मेवा
होतील तुझी स्वप्नं साकार सारी
तुला माणसं मिळाली लय रे भारी
साऱ्या जन्माची सुटतील कोडी
बाळा लय भारी तुझी सासरवाडी
बाळा लय भारी तुझी सासरवाडी...!!४!!
लेखन...
आदि-जगन सिताराम खोकले
रा.सोमज ता.इगतपूरी जि.नाशिक
मो. 97 65 45 73 62
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: