कापूस खत व्यवस्थापन | kapus khat vyavasthapan | cotton fertilizer management
Автор: BharatAgri Marathi
Загружено: 2023-07-10
Просмотров: 26648
Описание:
▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
👉लिंक - https://krushidukan.bharatagri.com/
====================================================================
👨🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
🌱 भारतअॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.
✅आजचा विषय - 🌱कापूस खत व्यवस्थापन | kapus khat vyavasthapan | cotton fertilizer management👍
शेतकरीमित्रांनी कापूस पिकामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी जातींची निवड, रोग - कीड व्यवस्थापन या सोबतच खताचे योग्य नियोजन असेल तरच उत्पादन जास्त मिळू शकते. भरघोस उत्पादनासाठी रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खतांचा वापर करणे अपरिहार्य आहे. यासाठी प्रति एकरी ५ टन शेणखत द्यावे. रासायनिक खतामध्ये नञ, स्फुरद, पलाश या मुख्य अन्नद्रव्यांसोबतच मॅग्नेशियम, गंधक आणि कॅल्शियम ही दुय्यम तर जस्त, बोरॉन, लोह, मँगनीज, मॉलिब्डेनम इ. सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील थोड्या प्रमाणात आवश्यकता भासते. चला जाणून घेऊयात कापूस पिकास प्रति एकरी कोणती खते द्यावीत.
✅ड्रीप नसेल तर खालील खते द्यावीत -
1️⃣पेरणीच्या वेळी - २४:२४:०० - ५० किलो + म्युरेट ऑफ पोटॅश - ५० किलो + मायक्रोनुट्रीएंट खत १० किलो + मॅग्नेशियम सल्फेट १० किलो + दाणेदार सल्फर ८ किलो + दाणेदार कीडनाशक कार्बोफ्युरॉन ५ किलो
2️⃣पेरणीनंतर ३० दिवसांनी - १२:३२:१६ - ५० किलो + युरिया २० किलो + सुकलेल आणि चांगले कुजलेले शेणखत 200 किलो + मॅग्नेशियम सल्फेट १० किलो
3️⃣पेरणीनंतर ४५ दिवसांनी - युरिया २० किलो + म्युरेट ऑफ पोटॅश - ३० किलो
✅ड्रीप असेल तर खालील खते प्रति एकरी द्यावीत -
1️⃣पेरणीच्या वेळी - २४:२४:०० - ५० किलो + म्युरेट ऑफ पोटॅश - ५० किलो + मायक्रोनुट्रीएंट खत १० किलो + मॅग्नेशियम सल्फेट १० किलो + दाणेदार सल्फर ८ किलो + दाणेदार कीडनाशक कार्बोफ्युरॉन ५ किलो
2️⃣पेरणीनंतर २० दिवसांनी : १९:१९:१९ - ३ किलो ५ दिवसांच्या अंतराने ३ वेळा द्यावे
3️⃣पेरणीनंतर ३५ दिवसांनी - कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो + बोरॉन ५०० ग्राम प्रति एकरी द्यावे.
4️⃣पेरणीनंतर ४० दिवसांनी : १२:६१:०० किंवा १३:४०:१३ हे ३ किलो ५ दिवसांच्या अंतराने ६ ते ७ वेळा द्यावे
5️⃣पेरणीनंतर ७५ दिवसांनी : ००:५२:३४ हे ३ किलो ५ दिवसांच्या अंतराने ५ वेळा द्यावे.
6️⃣पेरणीनंतर १०५ दिवसांनी : १३:००:४५ हे ३ किलो ५ दिवसांच्या अंतराने ५ ते ६ वेळा द्यावे.
7️⃣पेरणीनंतर १२५ दिवसांनी : ००:००:५० आणि पोटॅशिअम शोनाइट हे ३ किलो ५ दिवसांच्या अंतराने ५ ते ६ वेळा द्यावे.
✅फवारणी मधून अन्नद्रव्ये व्यवस्थापन -
1️⃣लागवडीनंतर २० दिवसांनी : १९:१९:१९ - ५० ग्राम + सी रुबी २० ग्राम प्रति १५ लिटर पंप फवारणी
2️⃣लागवडीनंतर ३० दिवसांनी : कॅल्शिअम नायट्रेट - ५० ग्राम + बोरॉन १५ ग्राम + चिलेटेड झिंक १५ ग्राम प्रति १५ लिटर पंप फवारणी.
3️⃣फुलोरा अवस्थेमध्ये : महाधन फ्लॉवरिंग स्पेशिअल - 75 ग्राम + चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट १५ ग्राम प्रति १५ लिटर पंप फवारणी
4️⃣बोंड धारणा अवस्थेमध्ये : ००:५२:३४ - ७५ ग्राम + बोरॉन १५ ग्राम + मॅग्नेशियम सल्फेट ३० ग्राम प्रति १५ लिटर पंप फवारणी
5️⃣बोंड पोसत असतांना : ००:००:५० - ५० ग्राम + मॅग्नेशियम सल्फेट ५० ग्राम प्रति १५ लिटर पंप फवारणी
तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
👉भारतअॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF
#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: