गहू बेसल खत । गहू पिकामध्ये खत व्यवस्थापन | gahu pikamadhye basal dose kai takava |
Автор: CropXpert India
Загружено: 2023-11-04
Просмотров: 20024
Описание:
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
रब्बी हंगाम सुरु झाला आहे. राज्यामध्ये काही ठिकाणी गहू पेरणी देखील सुरु झालेल्या आहेत, यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बेसल डोस म्हणजेच खतांचे व्यवस्थापन तर हेच व्यवस्थापन कसे करावे याबाबत संपूर्ण माहिती आता आपण पाहणार आहोत.
नत्र
नत्र हे पिकाची वाढ करण्यात मदत करतं. व या पिकामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये वापरले जाणारे खत आहे. तसेच हे पिकामध्ये प्रोटीन फॉर्मशन मध्ये मदत करणार आहे.
स्फुरद
स्फुरद हे पिकामध्ये फुटवे वाढवण्यासाठी मदत करणार आहे, तसेच सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुळांची देखील वाढ करण्यात मदत नक्कीच करणार आहे.
पोटॅश
पोटॅश हे दाण्यांची वाढ करण्यामध्ये आणि खोडाला आकार देण्यामध्ये फुटव्यांची जाडी होण्यामध्ये मदत करणार अहे परंतू कमी प्रमाणामध्ये याची गरज पिकाला अस्ते.
सल्फर
UK मध्ये केलेल्य अभ्यासनुसार सल्फर हे गहू पिकामध्ये देणे अत्यंत गरजेचे आहे.
ते पिकाला दिल्याने नत्र युक्त खाते पिकामध्ये योग्य प्रमाणामध्ये लागु करण्यासाठी मदत करते तसेच बुरशीनाशक म्हणून देखील काम करते, जमिनीमध्ये गरमी ठेवून वापसा अवस्थेमध्ये ठेवण्यात मदत करेल. ज्यामुळे फुटवे होण्यात देखील मदत मिळणार आहे. तर लक्षात असुद्या की जेव्हा आपण गहू पिकाला नत्र देतो
तेवा सल्फर देणे आवश्यक आहे.
झिंक
झिंक हे पिकामध्ये एन्झाईम सिक्रेशन करून अन्नद्रव्य लागू करण्यासाठी मदत करणार आहे. तसेच हे पिकामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढवते त्यामुळे तांबेरा वेळीच रोखला जाईल. पिकामध्ये ताकत देखील देणार आहे.
टीप
एक गोष्ट लक्षात असुद्या तुम्ही नत्र, स्फुरद, पालाश, हे खते योग्य प्रमाणामध्ये वापरले आणि झिंक चा योग्य प्रमाणामध्ये वापरले नाही तर उत्पन्न कमी होऊ शकते, त्यामुळे झिंक चा योग्य वापर आवश्यक आहे.
खतांची मात्रा
1)
20:20:00:13 किंवा 24:24:00:08 यापैकी एक बॅग प्रति एकरी
15:15:15 @2 बॅग प्रति एकरी
झिंक सल्फेट @6 ते 7 किलो प्रति एकरी
हे नाही भेटले तर आपण
2)
युरिया @1 बॅग
सिंगल सुपर फॉस्फेट @2 बॅग
पोटॅश @ 25 किलो
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.
तुमच्या शंका आणि प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी कमेंट मात्र नक्की करा.
आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका.
काही शेतीबद्दलची थोडक्यात माहिती पाहण्यासाठी आपल्या इंस्टग्राम पेजला भेट द्या.
लिंक :- https://instagram.com/shetkari_kida?i...
उत्पन्न तुमचे, मार्गदर्शन शेतकरी किड्याचे....!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: