TPM Marathi Song 329 - Vijayi Mandali Nenyas Laukar Ye (2026 Mumbai Convention Marathi Song No. 8)
Автор: Prince Ashley
Загружено: 2026-02-05
Просмотров: 63
Описание:
VICTORIOUS CHURCH
1 विजयी मंडळी नेण्यास लवकर ये येशू
घेऊन जा पवित्र, निष्कलंक वधू तू
अजून किती वेळ लागेल येण्यास तुला
'येशू ये लवकर ये' जीव आतुरला माझा.
धृः हल्लेलुया ! किती आनंद होईल !
प्रिय येशूचे मुख जेव्हा पाहीन
प्रेमळ हाताने अश्रू पुसणार माझे
निघून जातील सर्व दुःख उसासे.
2 नाश होत आहे पृथ्वी पाप, अधर्माने
प्रेम व विश्वास मंडळीत नाहीसे झाले
सामर्थ्य नाकारीले, घेतले रूप सुभक्तीचे
'येशू ये लवकर ये' मन लागेना येथे.
3 वाढत आहे युद्ध राज्य राज्यांमध्ये
दुष्काळ, महामारी पसरत आहे वेगाने
वाढली अशांती व अनीती जगामध्ये
'येशू ये लवकर ये' मन व्याकूळ आहे.
4 तुझ्या येण्याची वेळ ठाऊक कोणास नाही
सकाळी, संध्याकाळी किंवा, मध्यरात्री
प्रार्थनेत जागृत व संघर्ष करूनी
'येशू ये लवकर ये' करितो मी विनंती.
5 हे जगत माझे शाश्वत नगर नाही
वाट मी पाहlतो स्वर्गीय नगराची
विजयी संतासह भेटण्यासाठी तुला
'येशू ये लवकर ये' नेण्यासाठी मला.
#tpm #maratisong #tpmsong #tpmmaratisong2026 #mumbaiconvention #mumbaiconventionsongs2026 #tpmmumbaiconventionsong2026
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: