उत्तिष्ठत जाग्रत !
Автор: ज्ञान प्रबोधिनी / Jnana Prabodhini
Загружено: 2023-09-09
Просмотров: 5335
Описание:
उत्तिष्ठत जाग्रत !
त्या तेजस्वी डाेळ्यांमधली वीज अजुन सांगते
उत्तिष्ठत जाग्रत ! बंधूंनाे उत्तिष्ठत जाग्रत ! ।।ध्रु.।।
ऐन याैवनी मदन दाहुनी जे प्रलयंकर झाले
वेदान्ताच्या गूढ गुंजनी जे नवशंकर झाले
हिंदुधर्म अन हिंदुदर्शने जगात गाजविली
मानवमात्रा बंधुत्वाची साद जये घातली
असुन विरागी नि:संगाचे जे स्वामी हाेत ।।१।।
अखिल विलासांसह नत हाेती यक्षभूमि पश्चिमा
मनी परंतु मायभूमितिल आर्तांची वेदना
आणि भुकेल्या श्वानास्तवही माेक्षाची हेळणा
हेच डाेळुले शिणले हाेउनि बुद्धाची करुणा
मठबद्धांना मानवतेची शिकवित नवगीते ।।२।।
त्या डाेळ्यांनी अनागताचा थेट वेध घेउनी
भारतभूच्या भवितव्याचे स्वप्न भव्य पाहिले
आत्म्याचे संगीत ऐकवुनि जडवादी दुनियेला
भारत विश्वगुरू करण्याचे कार्य अजुनि राहिले
त्या कार्याचा वसा घेउ या, ताेच ध्यास ध्येय ते ।।३।।
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: