अखाडी सन विशेष माहिती | गुरुपौर्णिमा | अखाडी एक परंपरा
Автор: YOGESH RAYJADE Films (YRF)
Загружено: 2023-07-17
Просмотров: 1040
Описание:
|| गुरुपौर्णिमा आणि अखादी एक पहिला मराठी सणं ||
गुरुपौर्णिमा ही एक परंपरा आहे जी सर्व आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंना समर्पित आहे. हे गुरू उत्क्रांत किंवा प्रबुद्ध मानव मानले जातात जे कर्मयोगावर आधारित त्यांचे ज्ञान शिष्यांना देतात. गुरुपौर्णिमेचा सण भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मीयांद्वारे साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा ही पारंपारिकपणे एखाद्याच्या निवडलेल्या आध्यात्मिक शिक्षकांचा किंवा नेत्यांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते.
एकलव्य
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आषाढ (जून-जुलै) या हिंदू महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. महात्मा गांधी यांनी त्यांचे आध्यात्मिक गुरू श्रीमद राजचंद्र यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या उत्सवाचे पुनरुज्जीवन केले. याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. कारण हा दिवस म्हणजे महाभारताचे लेखक आणि वेद संकलित करणारे ऋषी वेद व्यास यांचा जन्मदिवस आहे. म्हणून या दिवशी व्यास यांची पूजा करण्याची प्रथा आहे.
|| अखाडी ||
आखाडी गुरुपौणिमा किंवा व्यासपूजा म्हणून ओळखला जाणारा हा सण झाडीपट्टीत अकाडी (आखाडी) म्हणून साजरा करतात. वर्षभरांतील सणांची सुरूवात या सणापासून होते. मराठी कालगणनेनुसार आषाढ हा पहिला महिना. शेतक-यांसाठीही शेतीकामाचा तसा तो पहिला महिना असतो. गृहिणींचा या सणाला पहिला तेलरांदा (तळणाचा स्वयंपाक) होत होता ; म्हणजेच घरात पक्वान्न् तयार करण्याची सुरूवात या सणापासून व्हायची. गाई राखणारे गायकी, बैल राखणारे बैलकी, म्हशी राखणारे भसकी आणि गुरे राखणारे ढोरकी यांच्या दृष्टीने हा सण फार महत्त्वाचा असायचा. या दिवशी ते आपल्या गुरांना चारा व सावली देणा-या मोह वृक्षाची पूजा करायचे. या दिवसापासून मोहाच्या पानांनी तयार केलेल्या पात्रात जेवायला प्रारंभ होत असतो. या सणाला पाटावर पाच किंवा सात तांदळाचे छोटे ढीग टाकून गृहप्रमुख पूजा करीत असतात अकाडीच्या दिवशी शेतात लावणीचे काम बंद राहायचे. अकाडी, जिवती, नागपूजा, राखी, कानोबा हे सण साधारणपणे धानाच्या लावणीच्या काळात येतात. पण झाडीपट्टीत त्या सणांच्या निमित्ताने रोवणे बंद ठेवले जाते. त्या दिवशी माणसांना व बैलांनाही संपूर्ण सुटी असते. शेतात फेरफटका मारायची देखील परवानगी नसायची.
या सणाचे महत्त्व विविध भागात विविध पद्धतीने आहे काही ग्रामीण भागात गावाबाहेर असलेल्या गावदेवतेची पूजा करायला लोक घरून ताट करून द्यायचे व तेथे नारळ फोडायचे गावाच्या वेशीवर असलेले देवताला गावात रोगराई येऊ नाही म्हणून साकळे घालायचे.
तसेच शेतकरी शेतीचे कामे करण्यासाठी ग्राम देवतांची पूजा करून उत्पन्न वाढिकरीता व कोणत्या ही प्रकारची नैसर्गिक आपत्ती येऊ नये
उदा. अतीरूष्टी
कोरडा दुष्काळ ही हाणी होऊ नये म्हणून अखाळी हा सन साजरा केला जातो व मातामाय व तारामाय या ग्राम देवतांची पूजा केली जाते
अखाळी हा पहीला सन असून गाव सुरक्षेसाठी गावाकडे ग्राम देवतांची पूजा करुन आरती देण्यात येते
गावातील ग्राम देवी ह्या सात बहिणी होत्या
सात बहिणीची नावे
1. मरी माय
2. जाना माय
3. शितला माय
4. आसरा माय
5. ईना माय
6. खोकला माय
7. माता माय
या गावातील ग्राम देवी आहे
आपण आपली परंपरा आपली संस्कृती सर्वांनी जपली पाहिजे माणूस दिवसेंदिवस मॉर्डन होत चालला आहे व आपले सन संस्कृती विसरत चालला आहे
त्यासाठीचं हा माझा छोटासा प्रयत्न आहे की आहे सन आपला इतिहास आपल्याला माहित असावा म्हणून मी व्हिडीओ च्या माध्यमातून आपल्याला ही माहिती देत आहे तर आपल्या सर्वांच्या स्पोर्ट ची गरज आहे म्हणून व्हिडीओला like ,शेअर आणि चायनलला सुब्स्क्राईप करा...🙏🏻🙏🏻🙏🏻
_________________________________________________
मी इंस्टाग्राम वर कॉमेडी चे शॉर्ट व्हिडीओ टाकत असतो त्या ठिकाण मला फॉलो करा स्पोर्ट करा...🙏🏻🙏🏻🙏🏻
id - iamyogeshrayjade
id - aapla_comedy_boy
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: