प.पू. श्री नाना महाराज तराणेकर यांचे अष्टक - (P.P Shri Nana Maharaj Taranekar - Ashtak)
Автор: Nana Maharaj Taranekar
Загружено: 2020-05-07
Просмотров: 153443
Описание:
शब्द रचना - श्री विट्ठल माधव पागे / Shri Vitthal Paage
मुख्य स्वर - सौ शुभदा मराठे / Sou Shubhada Marathe
।। श्री मार्तंडाष्टक ।।
नमो शान्तरुपा नमो भक्तनाथा
नमो वासुदेव कृपा पूर्ण भोक्ता ।।
नमो योगयुक्ता नमो चित्स्वरुपा
नमो श्रीगुरो दिव्य मार्तंडरुपा ।।१।।
सदा वैखरी नामरंगात रंगो
सदा लोचनीं मूर्ती तुझी तरंगो ।।
सदा या हृदी पाऊलांनी वसावे
कृपेने तुझ्या हे जिणें धन्य व्हावे ।।२।।
तुझी दिव्यलीला सदा मी स्मरावी
सदा अंतरी दतवीणा स्फुरावी ।।
मला भूतमात्रांतरी तू दिसावे
कृपेने तुझ्या हे जिणें धन्य व्हावे ।।३।।
सदा वर्षवी आपुली प्रीती दीनां
दयेची प्रभा शीतला तापहीना ।।
तुम्ही माय ! या लेकरा सावरावे
कृपेने तुझ्या हे जिणें धन्य व्हावे ।।४।।
प्रभो राहता इंदूरी नाममात्रे
प्रतीती आम्हा अंतरी मात्र येते ।।
सदा स्मर्तृगामी आम्हालागी यावे
कृपेने तुझ्या हे जिणे धन्य व्हावे ।।५।।
नसे सांग भक्ती नसे योग ठेवा
तरी वत्सले या पदी ठाव द्यावा ।।
सदा लेकरा पाहता पाझरावे
कृपेने तुझ्या हे जिणे धन्य व्हावे ।।६।।
नसे ज्ञान हे काय मागु तुला मी
तुम्ही जाणते श्री गुरो पूर्णस्वामी ।।
यथा योग्य वाटे तसे तू करावे
कृपेने तुझ्या हे जिणे धन्य व्हावे ।।७।।
तुझी अर्चना आज या अष्टकाने
तुला अर्पिली भक्तीने बालकाने ।।
अता या विठूला जनीं वाढवावे
कृपेने तुझ्या हे जिणे धन्य व्हावे ।।८।।
श्रीमद्सद्गुरु नाना महाराज तराणेकर अर्पणमस्तु ।
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: