लोहगडावरील घोड्यांची आराम करण्याची जागा(घोड्याची पागा) 🐴😳 किल्ले लोहगड PART. 2
Автор: Darshan Mundhe
Загружено: 2026-03-09
Просмотров: 141
Описание:
Your Queries :- lohagad fort
lohagad fort trek
lohagad fort lonavala
lohagad fort history
lohagad fort making
lohagad fort pune
lohagad fort bharatpur
lohagad fort drone view
लोहगड किल्ल्याचा इतिहास :- लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच इ.स.पू. २००० वर्षांपूर्वी या किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, यादव या राजवटी या किल्ल्याने पाहिल्या.
इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक किल्ला होय. इ.स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुऱ्हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड–विसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला.
इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मुगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला.
पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स. १७१३मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंग्र्यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बांबळे याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स. १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखी मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा : "शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू – नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली." नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुऱ्यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुरे कैलासवासी झाले व नंतर १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने गडावरच्या मराठ्यांना गड रिकामा करायचा हूकुम सोडला. तेथून अनिच्छेनेच मराठे मागे फिरले.
#MARATHITREKKARVLOGGAR#Youtube #marathivlog #lohgadfort
हे सर्व उपकरणे वापरतो मी विडिओ बनवण्यासाठी
REDMI 9 PRIME Al QAUD CAMERA
LIKE, SHARE, SUBSCRIBE AND COMMENTS
[THANK FOR WATCHING THIS VIDEO🥰🙏]
________________________________________________________
Darshan Mundhe
From_ Karjat, Maharashtra (India) Darshan Mundhe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: