आधी बायकोला संपवलं, मग दरोड्याचा बनाव रचला, Buldhana मधल्या डॉक्टरनं हत्येचा प्लॅन कसा केला ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-01-30
Просмотров: 143184
Описание:
#BolBhidu #BuldhanaDabhadiCrime #BuldhanaDoctorCrime
डॉक्टर दाम्पत्याच्या घरावर दरोडा, पत्नीची हत्या, पतीची अवस्था गंभीर... १९, २० जानेवारीला बुलढाणा जिल्ह्यातल्या मातोळा तालुक्यातून अशी बातमी माध्यमांमध्ये आली. दाभाडी गावात राहणाऱ्या डॉक्टर पत्नीची हत्या करुन दरोडेखोरांनी तिच्या अंगावरचे दागिने चोरुन नेले होते. तर तिचा पती बेशुद्ध पडला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बोराखेडी पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घ्यायला सुरुवात केली. दरोडा टाकून पसार झालेल्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी टीम्स तयार केल्या. मग फिंगर प्रिंट्स एक्सपर्ट्स बोलवण्यात आले, डॉग स्क्वाडला पाचारण करण्यात आलं. तरीही दरोडेखोरांबाबत कोणतीही माहिती पोलिसांना मिळत नव्हती. डॉक्टर पती बेशुद्ध असल्यानं तो हॉस्पिटलमध्ये अँडमिट होता, त्यामुळं त्याचीही चौकशी पोलिसांना करता येत नव्हती. दरोडेखोरांचा शोध घेऊन घेऊन पोलिसही हैराण झाले. पण त्याचवेळी पोलिसांनी या प्रकरणाचा वेगळ्या बाजूनं तपास करायचं ठरवलं आणि त्याचवेळी पोलिसांना या प्रकरणात एक वेगळा अँगल सापडला. हत्येचा...
दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी डॉक्टर महिलेला मारलं नसून ही एक ठरवून केलेली हत्या असल्याचं पोलिसांच्या चौकशीत समोर आलं. धक्कादायक गोष्ट म्हणजे ही हत्या करणारा दुसराप, तिसरा कोणी नसून त्या महिलेचा पतीच असल्याचं समोर आलं आणि या हत्येमागचं धक्कादायलक कारण समोर आलं. बुलढाण्यातल्या दाभाडी गावातलं हे हत्या प्रकरण नक्की आहे काय, डॉक्टरनं आपल्या पत्नीची हत्या कशी केली आणि दरोड्याच्या आड दडलेल्या या हत्येचा शोध पोलिसांनी कसा लावला, त्याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: