उपासनासंगीत:- गीत क्र.45 किती गोड ! किती रे गोड ! नाम तव वाटे ॥
Автор: Upasana Geet Gayan Abhiyaan Maharashtra
Загружено: 2025-11-15
Просмотров: 1905
Описание:
प्रभु येशुच्या नामात आपणा सर्व श्रोतु गणाचं सहर्ष स्वागत !
" उपासना गीत-गायन अभियानाच्या" उपक्रमास आपणा उपासकांकडुन भरपूर प्रतिसाद मिळत आहे
यासाठी मनःपुर्वक आभार; आणि परमेश्वराला धन्यवाद !
आज आम्ही कवीवर्य नारायण वामन टिळकांचं उपासनासंगीतातील गीत क्र.45 वरील
किति गोड! किती रे गोड !
नाम तव वाटे ॥
हे भक्तिगीत समुह गीता ऐवजी युगलगीत आणि तेही पार्श्वसंगीतासह पारंपारीक चालीमध्ये सादर करीत आहोत.
ईश्वरावरील श्रद्धा आणि विश्वासाच्याद्वारे जो ईश्वरीय चिंतनात रमतो तो जीवनात सदोदित आनंदच भोगतो ! अशा आशयावरील हे गीत
शांतिदीप ट्रस्टच्या सौजन्यानं सादर करीत आहोत...
गायक;-
किशोर हिवाळे...आणि
प्रिन्सिपॉल डॉ. अर्चना देसाई (Principal Dr Archana Desai)
पार्श्वसंगीत:-किशोर हिवाळे
वाद्यवृंद:- श्रीनिवास केसकर आणि सहकारी (AIR)
सौजन्य :- शांतिदीप ट्रस्ट, पुणें.
युगलगीत ऐकल्यानंतर LIKE आणि SUBSCRIBE करून प्रतिक्रिया द्यायला मात्र विसरू नका.
संपर्कासाठी
9822639917 / 95525 96778
उपासना संगीत गीत क्र. ४५
नाममाधुर्य
किति, गोड ! । किती रे गोड ! । नाम तव वाटे, ।
मन प्रेमरसाच्या उले खळखळाटे. ।।ध्रु।।
सहवास । पुरे तव ह्यास, । स्वर्ग मग येशू
नच दुजा, दाखवी चरण तुझे आशू. ।।१।।
हृत्पटी । तुझी गोमटी । मूर्ति वसलेली, ।
ती उभीच माझ्यापुढें असो केली. ।।२।।
तूं प्रेम ! । मूर्त तूं प्रेम । प्रेम तूं देवा !
प्रभु, रूपा येशी धरुन येशु नावा. ।।३।।
मन्मना । एक वासना, तुझ्यासह जावें, ।
हे आयु येथले तुझेच तें व्हावे. ।।४।!
रेव्ह. नारायण वामन टिळक
(६ डिसेंबर १८६१ - ९ मे १९१९)
#christianmarathisongs #upasanasangit #marathichristiansongs #marathigane #christiansongs #devachigani #marathichristianhymns #music
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: