उपासनासंगीत क्र.222 - कोण हरिल मम पाप
Автор: Upasana Geet Gayan Abhiyaan Maharashtra
Загружено: 2025-09-13
Просмотров: 5681
Описание:
सर्व भक्तजनांस प्रभु येशुच्या नामात सहर्ष अभिवादन !
रविवारीच्या भक्ती-उपासनेत मंडळीला "उपासना संगीतातील" भक्तिगीतं सहजपणे गाता यावीत; या हेतुनं निरनिराळ्या गानवृंदाच्या समुहस्वरात ती ऐकविण्याचा आमचा प्रयत्न आपणा श्रोतागणाच्या सहकार्यानं सफल होत आहे, यासाठी ईश्वराला धन्यवाद ! उपासना संगीतातील अधिकाधिक गीतांच्या चाली मंडळीला अवगत होऊन, उपासनेत ती गीते गाता यावीत यासाठी आपणही या अभियानात सहर्ष सहभागी होऊन कार्यपूर्तीस प्रोत्साहन देत सहकार्य करावे अशी नम्र विनंती आहे.
आजच्या रविवारी
उपासनासंगीत क्र.222 वरील गीतात; ......
ईश्वराचा शोध घेताना प्रभू येशूचा साक्षात्कार झाल्यावर, विश्वासपूर्ण अंत:करणानं अखेर स्वानुभवाची ग्वाही देत कवी म्हणतो ..
ध्यानधारणा, जपतप, कर्मकांड किंवा कोणत्याही विद्यासाधनेनं ईश्वरप्राप्ती होत नाही. गळ्याभोवती आवळलेला पापाचा विळखा ख्रिस्ताला हाक दिल्यावरच सुटेल या विश्वासानं पापांगिकार करताना सुपरिचीत कविवर्य नारायण वामन टिळक म्हणतात.....
"ध्यानधारणा जपतप अवघा
तुजविण कोण हरिल मम पाप ॥
ऐकुयात समुहसूरात....
गीत सादर करीत आहे .... प्रभुगुणगान कलामंच पुणेचा संगीतप्रेमी गानवृंद !
गीत ऐकल्यानंतर LIKE आणि SUBSCRIBE करून प्रतिक्रिया द्यायला मात्र विसरू नका.
संपर्क :
98226 39917 / 95525 96778
#marathichristiansongs #marathigane
#ChristianMarathisongs
#Christiansongs#upasanasangitgane
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: