उपासना गीत क्र 20 -नम परममंगला , गौरवू तुला परमवत्सला Upasana Sangit Song no. 20 Nama Param mangala
Автор: Upasana Geet Gayan Abhiyaan Maharashtra
Загружено: 2023-09-23
Просмотров: 6842
Описание:
आजच्या गीतातील भक्तिभाव म्हणजे....
परमेश्वराचं अस्तित्व स्विकारणं ही मनुष्य मात्रासाठी संजीवनाची बाब आहे. अती बुद्धिवान माणसं पुष्कळदा परमेश्वराचं अस्तित्व मानत नाहीत. निसर्ग आणि मानव निर्मित शास्त्रीय संशोधनात गुंतून ते मानव धर्माला महत्व देतात. एका अर्थी हे चूक नसेलही! परंतु निसर्ग काय किंवा शास्त्रीय संशोधन काय, या सर्वांवर प्रभुत्व गाजवणारा कुणी तरी आहे, यावर ते भरवसा- विश्वास ठेवत नाहीत, ना लक्ष देत नाहीत !
काही बुद्धिवंत माणसं मात्र परमेश्वराचा शोध घेत राहतात. निरनिराळ्या धर्मग्रंथांचा मनापासून अभ्यास करतात.सनातनी तत्त्वांनुसार विचलीतही होतात, परंतु त्यांच्या निरलस आगतीकपणामुळं ईश्वर कृपेनं त्यांना साक्षात्कार घडतो. परिवर्तीत होऊन ते विश्वासात येतात. परमेश्वराला कुणी पाहू शकत नाही; परंतु त्याचं अस्तित्व जाणवणं हीच तर परमेश्वराची खरी किमया !!!!
ख-या ईश्वराचा शोध घेता ..
ईश्वरीय कृपेनंच.....
कवीवर्य रेव्ह.नारायण वामन टिळक ह्यांच्या जीवनात असंच काही परिवर्तन घडून त्यांना एकमेव असा वंद्य देव सापडला. आणि मग त्याच एका परमेश्वराला धन्यवाद देऊन गौरवताना आपलं सारं जीवन ते खर्ची पाडतात.
असा जगच्चालक,जगत्तारक आणि प्रेरणा देणारा पवित्र आत्मा ....
या त्रैक्य म्हटलेल्या देवाशिवाय दुसरा परमेश्वर कोण आहे? तेव्हा खात्रीपूर्ण विश्वास आणि श्रद्धायुक्त मनानं परमेश्वराला आपली नमस्कृती अर्पित करताना ऐकुयात...
उपासनासंगीत या भक्तिगीत संग्रहातील त्यांचं क्रमांक विसावं गीतपुष्प....
शांतिदीप गानवृंदाच्या समुहगान सूरात !
शब्द आहेत...
नम: परममंगला , गौरवू तुला परमवत्सला ॥
#christianmarathisong #christiansongs #MarathiUpasanaSangitSongs #MarathiUpasana
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: