Amit V. Deshmukh Speech / Mahavikas Aghadi Party workers Meeting in Latur Loksabha constituency
Автор: Amit V. Deshmukh
Загружено: 2024-03-30
Просмотров: 1232
Описание:
Amit V.Deshmukh Speech / Mahavikas Aghadi Party workers Meeting in Latur Loksabha constituency
महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने काम करून
लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. शिवाजी काळगे
यांना विजयी करावे
लातूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने
लातूर शहरातील महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
गुरूवार दि. २८ मार्च २०२४
राज्यात आपण महाविकास आघाडीचा धर्म पाळत आहोत, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या उमेदवारीचे तळागाळातून स्वागत होत आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही लातूर लोकसभा मतदारसंघातील घराघरात डॉ. शिवाजी काळगे यांचा प्रचार करावा एकदिलाने काम करून लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना विजयी करावे, असे आवाहन केले.
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुरुवार दि. २८ मार्च रोजी दुपारी लातूर शहरातील छत्रपती चौक परिसरातील श्री राधिका कन्वेंशन हॉल येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, माजी मंत्री विनायकराव पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख माजी आमदार दिनकरराव माने, शिवसेना संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण, माजी आमदार ईश्वरराव भोसिकर, महाविकास आघाडी काँग्रेसचे लातूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे, शहर जिल्हाध्यक्ष राजा मनियार, मुक्तेश्वर धोडगे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ग्रामीण जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, महानगर प्रमुख सुनील बसपुरे, पप्पू कुलकर्णी, संतोष सोमवंशी, शेतकरी कामगार पक्षाचे उदय गवारे, आम आदमी पार्टी लातूरचे अध्यक्ष प्रताप भोसले, लिंबन महाराज रेशमे, अभय साळुंखे, उषाताई कांबळे, माजी महापौर प्रा.डॉ.स्मिता खानापुरे, आशा भिसे, सुनिता चालक, जयश्री उटगे आदीसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विविध पदाधिकारी, महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविकास आघाडीचा धर्म आपण पाळणार आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, लातूर लोकसभा निवडणुकीत एक दिलाने काम करीत आहोत. डॉ. शिवाजी काळगे यांच्या उमेदवारीच स्वागत तळागाळातून होत आहे, ही निवडणूक विचाराची आहे. आपणाला डॉ. काळगेना मतदारसंघातील घराघरात पोहोचवायचे आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात डॉ. शिवाजी काळगे यांचे पारडे जड तर धाराशिव लोकसभा मतदारसंघात ओमराजे निंबाळकर यांचे पारडे जड आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, परभणी, धाराशिव, हिंगोली येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तर लातूर नांदेड येथे काँग्रेस पक्ष, बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लोकसभेच्या जागा जिंकेल असे त्यांनी सांगितले.
सामान्य माणसाला राज्यातील राजकारणाचा वीट आला आहे, ही निवडणूक सामान्य माणसाने हातात घेतली आहे. प्रत्येकाने आपले बुथ गाव सांभाळावे ते बुध अधिक सक्षम करावे, आपण समाजाच्या प्रश्नासाठी राज्याच्या हितासाठी आपण काम करीत आहोत. डॉ. काळगे अनेक वर्षापासून लातूरात वैद्यकीय सेवा देत आहेत. खासदाराने आपल्याला भेटावे, निवडून आल्यावर प्रत्येक महिन्याला एका विधानसभा मतदारसंघात डॉ. काळगे महाविकास आघाडीच्या वतीने जनता दरबार घेतील, लोहा कंधारचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार श्यामसुंदर शिंदे महाविकासआघाडी सोबत आहेत असेही त्यांनी आर्वजून सांगीतले.
या कार्यक्रमात माजी आमदार ईश्वरराव भोसिकर, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, शेतकरी कामगार पक्षाचे उदय गवारे, शिवसेनेचे बालाजी रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शेटे, मुक्तेश्वर धोडगे, राजा मणियार, आदमी पार्टी लातूरचे अध्यक्ष प्रताप भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ओमप्रकाश झुरळे यांनी केले तर शेवटी आभार प्रा. संजय मोरे यांनी मानले.
---------------
Subscribe For More Updates:
----------------------------------------------
YouTube: / amitdeshmukhofficial
Facebook: / amitdeshmukhofficial
Twitter: / amitv_deshmukh
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: