सेलूत बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी ची शाखा बंद होणार या अफवेने ठेवीदारांनी केली मोठी गर्दी
Автор: Ram Sonawane
Загружено: 2025-12-31
Просмотров: 4419
Описание:
सेलुत बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीची शाखा बंद होणार या अफवेने ग्राहकांनी केली बँकेत मोठी गर्दी
@ बुधवारी रात्री १० वाजेपर्यंत चालले आर्थिक व्यवहार.
@बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांनी ग्राहकांना केले आवाहन
राम सोनवणे सेलू
९४२२८७७८३१
शहरातील बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी शाखेत बुधवार ३१ डिसेंबर रोजी ग्राहकांनी सोने, रक्कम, तसेच एफ डी आर तोडण्यासाठी मोठी गर्दी केली होती. एवढी गर्दी होऊन देखील बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ग्राहकाच्या समाधानासाठी मागेल त्यांना रक्कम, सोने व एफ डी आर काढण्यास सहकार्य केले ही शाखा सायंकाळी ९ वाजेपर्यंत ही ग्राहकांच्या सेवेत व्यस्त होती. दरम्यान बीड जिल्ह्यातील वडवणी व अन्य शाखा पाठोपाठ परभणी जिल्ह्यातील सेलू येथील बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बंद होणार असल्याची अफवा पसरल्याने मोठी खळबळ उडाली. आपल्या बचत व ठेवी काढण्यासाठी आणि गहाण ठेवलेले सोने सोडवण्यासाठी बुधवारी सकाळी पासूनच सोसायटी शाखेसमोर गर्दी सुरू झाली होती. हि आफवा आहे.सर्वांचे बचत, ठेवी व सोने सुरक्षीत आहेत. असे शाखाधिकारी सुरेश काबरा, उद्योजक विजय बिहाणी तसेच बँकेचे इतर संचालक उपस्थित ग्राहकांना वारंवार स्पष्टीकरण देत होते.
हि आफवा आहे. यावर सभासद ग्राहक विश्वास ठेवत नव्हते ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मागील दोन वर्षांत ज्ञानराधा पतसंस्थेसह काही मल्टीस्टेट बँक आणि क्रेडिट सोसायट्यांनी ठेवीदारांचे करोडो रुपये बुडवल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे लोकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण आहे. याच दरम्यान, बुलढाणा अर्बन सोसायटीची सेलू शाखा बंद होणार असल्याची अफवा शहरासह परिसरात पसरली आणि अनेक ठेवीदार आपले पैसे सुरक्षित काढण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील शाखेसमोर पोहोचले. यामुळे खळबळ उडाली आहे. या आधीही एकदा बुलढाणा अर्बन सोसायटीबाबत अशीच अफवा पसरली होती. त्यावेळी खातेदारांना पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती. आणि बँकेने ही खातेदारांची सर्व रक्कम मागील त्यांना दिली होती त्यानंतर ग्राहकांना आपण अफेचे बळी ठरलो असे वाटल्यानंतर परत ग्राहकांनी पुरवत या बँकेकडे ठेवी ठेवण्यास सुरुवात केली होती आज पुन्हा तशीच घटना घडली असून लोकांनी तारण ठेवलेले सोने काढण्यासाठी वाटेल त्या मार्गाने पैसा जमा करून बँकेत गर्दी केली आहे. दरम्यान बुधवार 31 डिसेंबर रोजी बँकेच्या अखेरच्या ग्राहकांचे लोन परताव्याची कामकाज सायंकाळी दहा वाजता पूर्ण करत ग्राहकांचे समाधान करण्यात आले.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: