काजू फॅक्टरी, Borsut | Sangameshwar (Ratnagiri) | काजू प्रक्रिया उद्योग माहिती
Автор: Bhramanti
Загружено: 2023-08-16
Просмотров: 2441
Описание:
Cashew Nut Factory
काजू प्रक्रियेमध्ये उद्योजकतेच्या मोठ्या संधी आहेत. भारतात प्रामुख्याने काजू प्रक्रिया उद्योग हा केरळ आणि कर्नाटक, महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. कच्चा काजू दीर्घकाळापर्यंत साठवता येत असल्याने देशाच्या दूरवरील भागापर्यंत नेणे आणि प्रक्रिया करणे शक्य आहे. स्थानिक पातळीवर ग्राहकांना ताजे आणि उच्च प्रतीचे काजू उपलब्ध करता येऊ शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रक्रिया अत्यंत सोपी असून, कमी व स्वस्त यंत्रसामग्रीच्या साह्याने एका खोलीतून हा उद्योग सुरू करता येतो. त्यात कच्चे काजू सूर्यप्रकाशामध्ये वाळवून पोत्यामध्ये साठवण केली जाते. असे कच्चे काजू बॉयलरमध्ये वाफेवर शिजवून मऊ केले जातात. त्यासाठी लहान आकाराचे बॉयलर उपलब्ध आहेत. वाफवलेल्या काजूबोंडावरील आवरण कुशल मजूरांच्या साह्याने हाताने चालवल्या जाणाऱ्या अवजाराने काढली जातात. आतील काजू पुन्हा कॅबिनेट ड्रायरमध्ये वाळवले जातात. त्यानंतर त्यावरील लालसर साल काढली जाते. या प्रक्रिया केंद्रांना भारतीय अन्न सुरक्षा आणि प्रमाणीकरण प्राधिकरण, २००६ चे निकष पाळावे लागतात.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: