Baramati Election 2026 : बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाही? लक्ष्मण हाकेंचा नेमका प्लॅन काय?
Автор: Loksatta
Загружено: 2026-03-17
Просмотров: 20149
Описание:
Baramati Election 2026 : बारामती विधानसभा मतदारसंघाचा इतिहास जर पाहिला. तर गेली ५९ वर्षे शरद पवार आणि अजित पवार हे दोघेच तिथे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यापैकी ६ वेळा शरद पवार आणि ८ वेळा अजित पवार हे बारामतीचे आमदार झालेत. अजित पवार हे तीनवेळी एक लाखांच्या मताधिक्याने निवडून आलेत. तर प्रत्येक निवडणूकीत त्यांचं मताधिक्य हे ५० हजारांच्या वरचं राहिलंय. अजित पवारांविरोधात एकदा निवडणूक लढवलेला उमेदवार पुन्हा रिंगणात उतरलेला नाही, असाही इतिहास आहे. गेल्या दोन निवडणुका जर पाहिल्या तर २०१९ मध्ये भाजपचे गोपीचंद पडळकर हा चेहरा तिथे दिला. तरीही 83 टक्के मतं घेऊन अजित पवार १ लाख ६५ हजार मतांनी जिंकले होते. २०२४ मध्ये घरातूनच विरोध होता, पुतण्या युगेंद्र पवार रिंगणात होता. लोकसभेला सुनेत्रा पवार पिछाडीवर होत्या, अशा परिस्थितीतही अजित पवार एका लाखांच्या मताधिक्याने जिंकले. मात्र तरीही बारामतीच्या इतिहासात युगेंद्र पवार हे अजित पवारांविरोधात सर्वाधिक मतं घेणारे उमेदवार ठरले होते.. त्यावरून हे लक्षात येतं की, बारामती म्हणजे पवार हे समीकरणं गेली ६० वर्षे तिथे सुरु आहे...
आता बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलीय. अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे बारामतीची जागा रिक्त झालीय. तिथे उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार असणार आहेत. निवडणूक बिनविरोध होण्याचीच दाट शक्यता आहे. मात्र अशात आता एका नव्या चेहऱ्याने बारामतीमध्ये एन्ट्री घेतलीय. तो चेहरा म्हणजे लक्ष्मण हाके... बारामतीची पोटनिवडणूक लढवण्याचा विचार लक्ष्मण हाके करत असल्याचं बोललं जातंय. आपण निवडणूक लढवावी यासाठी बारामतीतील कार्यकर्त्यांकडून मोठा आग्रह असल्याचं हाके म्हणाले. लोकशाहीत निवडणुका बिनविरोध होणे चुकीचं आहे. दादांच्या निधनानंतर होत असलेली निवडणूक ही अनुकंपा म्हणून आम्ही मानायची का? दादांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी हे शपथविधी करतात. आजोबा, नातू अधिवेशनाला निघून जातात. मग दुःख फक्त आम्ही करायचे का? असा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी विचारला...
#sharadpawar #ajitpawar #baramati #yugendrapawar #maharashtranews #maharashtrapolitics #sunetrapawar #india
You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: https://bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: https://www.loksatta.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: