परभणीत महार वतन जमीन घोटाळ्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची करण्यात आली मागणी
Автор: Ram Sonawane
Загружено: 2025-11-10
Просмотров: 297
Описание:
परभणीत महार वतन जमीन घोटाळ्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची करण्यात आली मागणी
राम सोनवणे सेलु
९४२२८७७७३१
परभणीत आज सोमवार १० नोव्हेंबर रोजी पुण्यातील महार वतनाच्या जमिनीवरील घोटाळ्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसतर्फे तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन ‘आंदोलन भूमी’ येथे आयोजित करण्यात आले होते, जिथे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला.
यानंतर आंदोलनातून निघालेल्या पदयात्रेदरम्यान घोषणा देत जिल्हाधिकारी परभणी यांच्यामार्फत राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करण्यात आले, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि महार वतन जमीन घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यात यावी, व ॲट्रॉसिटी या कलमांतर्गत याची नोंद सुद्धा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दिलेल्या या निवेदनात नमूद करण्यात आले की, पार्थ पवार यांनी आंबेडा कंपनीच्या माध्यमातून पुण्यातील महार वतनातील जमिनीचे मोठ्या प्रमाणात व्यवहार करून आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे. या गंभीर प्रकरणात सरकारकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने युवक काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, अनुसूचित समाजाच्या ऐतिहासिक हक्कांच्या जमिनींवर अन्याय होऊ देणार नाही. दोषींवर गुन्हे दाखल करून निष्पक्ष चौकशी होईपर्यंत युवक काँग्रेसचा लढा सुरू राहील.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल जाधव यांनी केले. या वेळी वैजनाथ देवकते, प्रदीप सोनटक्के, सुहास पंडित, इरफान जमीनदार, सुदर्शन कदम, अंगद सोगे, सत्तार पटेल, शजी अहमद खान, नितीन रनेर, अतिश गरड, ऍड. सय्यद एजाज, शेख नाजेम, रामेश्वर कुरे, आसिफ पटेल, मारुती चव्हाण, जयराम डुकरे, कैलास टेकाळे, रोहिदास बोबडे, शिवाजी भालेराव, वामनराव बोबडे, शेख फहीम, पठाण असलम यांच्यासह युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: