सेलूत सर्वोदय नगर मध्ये भरधाव दुचाकी नालीत पडल्याने एकाचे निधन;दोनजण गंभीर जखमी
Автор: Ram Sonawane
Загружено: 2025-12-14
Просмотров: 2694
Описание:
सेलुत सर्वोदय नगरमध्ये भरधाव दुचाकी नालीत पडल्याने एकाचे निधन ;दोनजण गंभीर जखमी
@राष्ट्रीय महामार्ग ५४८ बी वरील अर्धवट कामामुळे झाला अपघात.
राम सोनवणे,सेलु
९४२२८७७८३१
शहरातील राष्ट्रीय महामार्ग ५४८ बी सेलु शहरातील पाथरी रेल्वे गेट ते डिग्रस पाटी दरम्यान झालेल्या पाच कि.मी.च्या अर्धवट कामामुळे आतापर्यंत अनेकजणांचे बळी गेले तर काहींना कायमचे अपंगत्व आले. तरी पण या कामाचे गुत्तेदार सरस्वती कंट्रक्शन कंपनी यांनी रस्त्याचे सोडलेले अर्धवट काम मात्र पूर्ण केली नाही.अशाच सर्वोदय नगर परिसरात नालीवर ढापाच नसल्याने झालेल्या अपघातात भरधाव दुचाकी वरील तीन तरुणा पैकी एकाचे निधन झाले तर अन्य दोघाजणावर परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात शुक्रवार १२डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास घडला. असून शनिवारी रात्री आठ वाजता दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे शहरातील शासकीय विश्रामगृहासमोर जे.डी.बॅटरी या दुकानाजवळ सर्वोदय नगर परिसरात दुचाकी क्रमांक ४३ बी.एम.४८५६ या दुचाकीवरून तिघे तरुण भरधाव दुचाकी चालवत असताना या दुचाकीला अपघात होऊन दुचाकी थेट धापा नसलेल्या नालीत कोसळली या अपघातात प्रेम अनिल धापसे या तरुणाचे उपचारादरम्यान निधन झाले तर विजय कोंडीबा अंभुरे राहणार सर्वोदय नगर, आशिष संजय तोडके राहणार सर्वोदय नगर हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमी विजय कोंडीबा अंभोरे वय २१ वर्षे याने दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं ६३०/२०२५कलम १०५/१,२८१,१२५अ,१२५ब भारतीय न्याय संहिता अन्वये आशिष संजय तोडके राहणार सर्वोदय नगर सेलू याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत पुढील तपास करत आहेत.दरम्यान सेलू शहरातील पाथरी रेल्वे गेट ते डिग्रस पाटी या ५४८ बी राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट काम यामध्ये रस्ता, सोडलेले दुभाजक, नालीवरील ढापे, रस्त्यावरून कॉलनी मध्ये जाणारे मार्ग आणि लक्कडकोट परिसरातील विजेच्या खांब असे सर्वच कामे अर्धवट असल्यामुळे सरस्वती कंट्रक्शन कंपनी यांनी सोडलेल्या या अर्धवट कामामुळे आतापर्यंत अनेक जणांना प्राणास मुकावे लागले तर काहीना कायमचे अपंगत्व आले आहे. दुचाकी चालकाच्या मृत्यूची ही घटना केवळ नालीवर ढाबा नसल्यामुळेच झाली असल्याचे घटनास्थळी अपघात पाहणारे रहिवाशी बोलत होते.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: