Thane Mahanagarpalika मध्ये आधी भाजपला गुंडाळलं आता 4 नगरसेवक बिनविरोध, Eknath Shinde चं पुन्हा बॉस?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-02
Просмотров: 91140
Описание:
#BolBhidu #ThaneMunicipalElection #EknathShinde
राज्यातल्या महापालिका निवडणुकांमध्ये मुंबईप्रमाणेच ठाण्यातली लढतही लक्षवेधी ठरली आहे. ठाणे महापालिकेत शिंदेसेना आणि भाजप एकत्रपणे निवडणूक लढवत असले, तरी इथं एकनाथ शिंदे हेच सर्वार्थाने भाई असल्याचं सिद्ध होतंय. मुंबईमध्ये भाजपने अंतर्गत सर्व्हे आणि ठाकरे बंधूंच्या युतीचा हवाला देत शिंदेसेनेला कमी जागा देण्याचा प्रयत्न केला. पण, ठाण्यात भाजपला एकनाथ शिंदेंपुढं नमतं घ्यावं लागलं. भाजपला कमी जागा देऊन या पालिकेमध्ये आपलंच वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिंदेसेनेला ठाण्यात प्रत्यक्ष लढाईच्या आधीच मोठं यश आलं आहे. कुठं विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं, तर कुठं प्रतिस्पर्धी उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतल्यानं शिंदेसेनेचे चार उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यामुळं प्रत्यक्ष मतदानाच्या आधीच ठाण्यात शिंदेसेनेने विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू केल्याचं चित्र निर्माण झालंय. ठाणे शहरात असलेलं बळ आणि विखुरलेले विरोधक पाहता, या निवडणुकीत युतीला वातावरण अनुकूल असल्याचा दावा करण्यात येत होता. त्यातच आता चार नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानं शिंदेसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. पण, मुळातच राज्याचं लक्ष लागलेल्या या ठाणे महापालिकेचा विस्तार कसा होत गेला? त्यातून इथलं राजकारण नेमकं कसं आकाराला येत गेलं? आणि या निवडणुकीत राजकीय समीकरणं कशी तयार होत आहेत? सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊ या व्हिडिओतून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: