2 Types Drumstick Pickle,शेवग्याच्या शेंगांचे लोणचे/सहजन,मोरींगा का आचार,ढोल का छड़ी!!
Автор: Maithili's Foodstop
Загружено: 2025-05-06
Просмотров: 114
Описание:
Drumstick Pickle
शेवग्याच्या शेंगांचे लोणचे
सहजन,मोरींगा का आचार
ढोल का छड़ी
साहित्य :-
20-25 शेवग्याच्या शेंगा( अर्धा किलो )मी अंदाजे घरच्या कोवळ्या शेंगा घेतल्या आहेत.
10-15 लसूण पाकळया
10-15 हिरव्या मिरच्या
1/2 अर्धी वाटी मोहरीचे तेल
1/2 टी स्पून बडीशेप
1/2 टी स्पून मेथ्या
1 टी स्पून ओवा
1 टी स्पून हिंग
2 टेबल स्पून अख्खे धणे
1 टेबल स्पून जीरे 1/2 अर्धी वाटी भाजून जाडसर (दरदरा) कुटलेले शेंगदाणे
1 टी स्पून हळद
2 टेबल स्पून लाल तिखट (आवडीनूसार कमी- जास्त )
1 टेबल स्पून व्हिनेगर
1 टेबल स्पून लिंबू रस
चवीनुसार मीठ
2 टेबल स्पून घरात असेल तर लोणच्याचा रेडीमेड मसाला
जर नसला तर
1/2 वाटी मोहरी डाळ फेटून टाकावी
कृती :-
1 मी घरच्या शेंगा घेतल्या आहेत.तुम्ही बाजारातून आणताना शक्यतो कोवळ्या शेंगा आणा.
2 सर्व शेंगा धुवून थोड्या कोरड्या करून वा सुकवून घ्याव्यात.
3 सर्व शेंगा सोलून त्यांचे बारीक तुकडे करावेत.
4 एका पसरट बाउल मध्ये ते ठेवावेत.
5 एका कढईत बडीशेप ,मेथ्या,ओवा, हिंग,अख्खे धणे,जीरे हे सर्व मंद आचेवर भाजून घ्यावे.
6 सर्व भाजलेले जिन्नस एकत्रीत जाडसर/ दरदरा वाटून घ्यावेत.
7 जाडसर/ दरदरा वाटून घेतलेले मिश्रण व अर्धी वाटी भाजून जाडसर (दरदरा)शेंगदाणा कूट,हळद, लाल तिखट (आवडीनूसार कमी- जास्त ), व्हिनेगर,लिंबाचा रस हे सर्व बाउल मधील
शेंगांच्यामध्ये छान मिक्स करावे.
8 जर घरी रेडीमेड लोणचे मसाला असला तर दोन - तीन चमचे तो ही मिक्स करावा.
9 लोणच्याचा रेडीमेड मसालाजर नसला तर 1/2 वाटी मोहरी डाळ फेटून टाकावी.
10 एका कढल्यात मोहरीचे डावभर तेल टाकून धूर निघून वास कमी झाला की त्यात मोहरी ,हिंग,हळद घालून खमंग फोडणी करून ती पूर्णपणे गार करावी.
11 गार फोडणी बनवलेल्या लोणच्यात मिक्स करून छान सगळीकडे लागेल याची काळजी घ्यावी.
12 एखाद्या काचेच्या कोरड्या हवाबंद बरणीत भरून 3-4 दिवस रोज कोरड्या चमच्याने वा बरणी खाली -वर करुन हलवावे .
13 अगदी वर्ष भर सुद्धा संपले नाहीतर टिकते फक्त ओला हात वा चमचा लावू नये.
14 अतिशय टेस्टी लागते.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: