Rahuri By Election | राहुरी पोटनिवडणुकीआधी प्राजक्त तनपुरे जयंत पाटलांना धक्का देणार?
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-03-16
Просмотров: 18753
Описание:
#rahuri #prajaktatanpure #akshaykardile
राहुरी विधानसभा मतदारसंघ.. अहिल्यानगर जिल्ह्यातील या विधानसभा मतदारसंघात आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर आता पोटनिवडणूक लागलीये. १५ मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने ५ राज्यांच्या निवडणुकांसोबत महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या. त्यातली एक म्हणजे अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेली बारामती आणि दुसरी म्हणजे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेली राहुरी विधानसभा. या पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिलला मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रयत्नशील आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला. मात्र आता अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. वहिनी विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणून सुप्रिया सुळेंनी बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास स्पष्टच केलंय. मात्र राहुरीमध्ये नेमकं काय होणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलंय. राहुरीत तनपुरे विरुद्ध कर्डिले असा संघर्ष पाहायला मिळणार कि जयंत पाटील यांचे भाचे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करणार? तेच या व्हिडिओतून समजून घेऊ.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Website : https://maharashtratimes.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi News explained Content.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: