India's Biggest Zoological Park In Nagpur I देशातील सर्वात मोठे प्राणिसंग्रहालय नागपूर,गोरेवाडा मधे
Автор: Explore With Carlekar
Загружено: 2024-06-29
Просмотров: 739
Описание:
नमस्कार मित्रांनो...
आज आलो आहे मी भारतातल्या सर्वात मोठ्या अश्या प्राणिसंग्रहालयात जे नागपूर शहराच्या जवळ आहे, गोरेवाडा येथे, गोरेवाडा हे नागपूर काटोल रोड वर,नागपूरपासुन साधरण 10 किमी अंतरावर असून, इथे जाण्यासाठी आपल्याला सीताबर्डी वरून कळमेश्वर काडे जाणाऱ्या बस, शेअर ऑटो,असे वाहन उपलब्ध आहेत तसेच आपण आपल्या स्वत:चे वाहन गेहून जाऊ शकता इथे गाडीचे (पार्किंग रु. 40)असून गोरेवाडा मधे सफरिसाठी तिकिटे ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष साइटवर ही उपलब्ध असतात
इथे सफारी साठी दोन प्रकारच्या गाड्या उपलब्ध आहेत एसी आणि नॉन एसी बसेस आसून त्याचे शुल्क - नॉन एसी बस साठी - आठवड्याच्या दिवशी 200 रुपये आणि वीकेंडला 300 रुपये, तर एसी बस साठी आठवड्याच्या दिवसात 300 रुपये आणि आठवड्याच्या शेवटी 400 रुपये असे आहे
गोरेवाडा प्राणिसंग्रहालय हे मंगळवार ते रविवार सुरू असते आणि, सोमवारी बंद असते,इथे पाहिली सफारी सकाळी ८.३० वाजतासुरू होते आणि शेवटची सफारी हीसंध्याकली ४.३० वाजता असते,सफारी साठी साधारण ऐक तास वेळ लागतो
गोरेवाडा प्राणिसंग्रहालय मधे 4 भाग केले आहेत त्यात पहिल्या विभागात बिबट्या सफारी दुसऱ्या विभागात अस्वल सफारी तिसऱ्या विभागात शाकाहारी प्राण्यांची सफारी घडते इथे आपल्याला विविध प्रकारचे हरीण, नीलगाय,सांबर, आणि मुख्याकर्षण असते ते दुर्मिळ पांढरे काळवीट पाहायला मिळते
त्यानंतर शेवटी असते ती टायगर सफारी..
ह्या प्राणी संग्रहालयाची सुरक्षा यंत्रणा पण खूप अत्याधुनिक आहे इथे दुहेरी सुरक्षा दरवाजे बसवलेले आहेत आणि एका विभागातून दुसऱ्या विभागात जण्या साठी ह्या दुहेरी सुरक्षा दरवाजांच्या आतून जावे लागते
इथे प्राण्यांच्या साठी कृत्रिम गुंफा आणि त्यांचे साठी पाण्याचे कृत्रिम स्रोत बनवले आहेत जेणेकरून प्राण्यांना विदर्भाच्या भीषण उनापासून थोडा गारवा मिळतो आणि प्यायला पाणी ही मिळते
सफारी संपली की आपण इथे छान पदार्थांचा आस्वाद घेता येतो ते इथे असलेल्या जंगल मूड रेस्टॉरंट मध्ये ज्याचे व्यवस्थापन आहे भारताचे सुप्रसिद्ध - शेफ विष्णू मनोहर ह्यांच्या देखरेखीखाली आणि इथे आपल्याला इको-फ्रेंडली प्लेट्स आणि कपमध्ये जेवण दिले जाते
या ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालया’चं’ उद्घाटन २६ जानेवारी २०२१ रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. ५६४ हेक्टर एवढ्या विस्तीर्ण भागात पसरलेल्या प्राणिसंग्रहालयात विविध प्रजातींचे प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी पाहायला मिळतात. यापैकी १४० हेक्टर भागात ‘इंडियन झू सफारी’ या आगळ्यावेगळ्या कल्पनेची सुरुवात वनविभागानं केली आहे
For Online Ticket Booking : https://wildgorewada.com/booking
#gorewada #wildgorewada #biggestzoo #nagpurzoo #nagpurwild #junglesafari #nagpurjungle #wildlife #wildlifephotography #nature #tigerpoint #leopardpoint
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: