UGC Act 2026चा General Category Students कडून विरोध,Yogi यांना बाजूला करण्यासाठी Shah यांचा प्लॅन ?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-27
Просмотров: 31839
Описание:
#BolBhidu #UGCRules2026 #YogiAdityanath
अलंकार अग्निहोत्री. उत्तर प्रदेशच्या बरेलीचे सिटी मॅजिस्ट्रेट. त्यांनी २०१९ साली उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केली होती. पण नुकताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कारण, सरकारच्या एका निर्णयाचा विरोध. सोमवारी, २६ जानेवारीला उत्तर प्रदेशाच्या अनेक शहरांमध्ये आंदोलनं झाली. ठिकठिकाणी हजारो विद्यार्थी रस्त्यावरती उतरले. मंगळवारपर्यंत हे आंदोलन राजधानी दिल्लीपर्यंत पोहचलं. मंगळवारी दिल्लीतही आंदोलनं झाली. हा विरोध आणि ही आंदोलनं होतायेत UGC च्या एका नियमामुळं. University Grants Commission अर्थातच UGC नं १३ जानेवारीला देशभरातल्या विद्यापीठांमध्ये नवा नियम लागू केला. 'प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एजुकेशन इंस्टीट्यूशन रेगुलेशन' असं या नियमाचं नाव. मात्र या नियमाविरोधात आता जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी रस्त्यावरती उतरले आहेत. हे नियम जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या विरुद्ध असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या विरोधात सोशल मीडियावरतीही वातावरण तापलंय. या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आलीये. महत्त्वाचं म्हणजे, यावरून आता राजकारणालाही सुरुवात झालीये, ज्यामुळं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ डॅमेज होत असल्याचं चित्र आहे. हा सगळा विषय नेमका आहे काय? UGC चे नवे नियम काय आहेत? या नियमांना जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी एवढा विरोध का करतायेत? यावरून राजकारण कसं सुरू झालंय आणि त्यामुळं डॅमेज कोण होणार आहे? समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: