Kunal Patil यांच्या BJP पक्षप्रवेशानंतर North Maharashtra मधून Congress संपल्याची चर्चा का होतेय ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-07-02
Просмотров: 30538
Описание:
#BolBhidu #KunalPatil #BJPvsCongress
मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काम करत होतो, त्यावेळी त्यांच्याकडे काम घेऊन जात नव्हतो. मात्र, एकदा गेलो, तेव्हा त्यांनी माझं ते काम केलं. देवेंद्र फडणवीस हे विकासकामं करणारी व्यक्ती आहेत. माझ्या भागाला न्याय मिळाला मला यापुढे काही नको, असं विधान करत काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. कुणाल पाटील यांचं कुटुंब जवळपास 70 वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ होतं. त्यांच्या कुटुंबामुळे धुळे जिल्हा हा कायम काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. पण आता त्यांच्या भाजप प्रवेशामुळं हा उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय. पण यावरुन चर्चा होतेय ती उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस बॅकफूटला गेल्याची.
याआधी उत्तर महाराष्ट्रातले जळगाव, नंदुरबार, धुळे हे जिल्हे काँग्रेसचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जायचे. नंदुरबार आणि काँग्रेसचं तर विशेष नातं राहिलंय. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने धुळे, नंदुरबार या लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळवला होता. पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा फटका बसला. के सी पाडवी, कुणाल पाटील यांसारख्या दिग्गजांचा पराभव झाला. पण आता कुणाल पाटील स्वतःच भाजपवासी झाल्यामुळं उत्तर महाराष्ट्राचा गड काँग्रेसच्या हातून निसटत चालल्याचं चित्र आहे. उत्तर महाराष्ट्रातली उरलीसुरली काँग्रेस संपल्याचं बोललं जातंय. पण कुणाल पाटील आणि त्यांच्या कुटुंबाची उत्तर महाराष्ट्रातली ताकद काय ? भाजपने उत्तर महाराष्ट्रात कसा जम बसवला ? आणि उत्तर महाराष्ट्रातून उरलीसुरली काँग्रेस संपत चालल्याचं का म्हटलं जातंय ? सगळी स्टोरी जाणून घेऊया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: