म्हामदे उत्सव झापडे, लांजा | आमच्या कोंकणी गावची जत्रा
Автор: Ruchira and Abhishek
Загружено: 2025-12-03
Просмотров: 1011
Описание:
मंडळी प्रत्येक कोकणवासीयांसाठी आपल्या गावची ग्रामदेवतेची जत्रा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतो. आमचं कोकणात नवीन घर बांधल्यापासून आमच्या झापडे गावातली आई श्रीनवलादेवीची वार्षिक जत्रा म्हणजेच म्हामदे उत्सवाला आम्ही आवर्जून हजेरी लावतो. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये म्हणजेच देव दिवाळीच्या आधी लांजातील झापडे गावाच्या ग्रामदैवत श्री नवलादेवीची वार्षिक यात्रा असते. या यात्रेत देवळातील सर्व देव पालखी मध्ये स्वार होऊन देवळाबाहेर येतात आणि देवळाला पाच प्रदक्षिणा मारून पुन्हा पालखी देवळात दाखल होते. यादरम्यान पारंपारिक वाद्याच्या तालावर पालखी आनंदाने आणि उत्साहाने आपल्या खांद्यावरती नाचवण्यासाठी जी भाविकांची चढाओढ लागते ती बघण्यासारखी असते. मुळात अशाच उत्सवांमुळे गावातील एकोपा वाढतो आणि सामाजिक जीवनाचा म्हणजेच सोशल लाइफ चा पाया भक्कम होतो. आमची आशा आहे तुम्ही सुद्धा आपल्या गावातील अशा उत्सवांना आवर्जून उपस्थित राहत असाल.
आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या गावची ही जत्रा बघायला मिळेल. म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंट करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा.
धन्यवाद.
#konkan #jatra #जत्रा #यात्रा #navalai #lanja
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: