Pune Crime : आरोपींची धिंड, पोलिसांची कडक कारवाई, व्हिडीओ समोर | Vandalism News
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-27
Просмотров: 14567
Описание:
#PuneCrime #SultanShaikh #PuneVandalism
पुण्यातील लक्ष्मी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वारंवार वाहनांची तोडफोड (vehicles Vandalism) करणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी प्रभावी कारवाई करत तब्बल २२ गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. काल रात्री येरवड्याच्या लक्ष्मी नगर परिसरात वाहनतोडफोडी करणाऱ्या गुन्हेगाराला भर चौकात नागरिकांसमोर पोलिसांनी धडा दिला. या कारवाईमुळे पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांची प्रशंसा होत आहे. अशा प्रकारची कारवाई सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत केली पाहिजे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.सुलतान रिजवान शेख (वय २०, रा. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) यांनी काही दिवसांपूर्वी लक्ष्मी नगर परिसरात वाहन तोडफोडी केली होती. त्याच्या विरोधात कारवाई म्हणून पोलिसांनी त्याला चांगलीच अद्दल घडवली. त्याने नागरिकांसमोर जिथे दहशत माजवली होती, तिथेच त्याला उठाबशा काढायला लावल्या. सोबत पोलिसांनी आवाहन देखील केले आहे की, याच्या विरोधात कोणालाही तक्रार द्यायची असेल तर निष्काळजीपणे तुम्ही तक्रार देऊ शकता.आरोपी सुलतान रिजवान शेख याच्याविरुद्ध पोलिस तपासात एकूण २२ गुन्हे उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी आरोपीने वाहनांची तोडफोड केली होती, त्याच परिसरात पोलिसांनी त्याची दिंड काढत नागरिकांमध्ये कायद्याबद्दल जनजागृती केली. या कारवाईमुळे गुन्हेगारांवर वचक बसण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांचे मत आहे.रवींद्र कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जनतेमध्ये विश्वास वाढविण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास लक्ष्मी नगर पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.
#MHT068
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: