हरभरा पीक बेसल डोस व्यवस्थापन । हरभरा खत व्यवस्थापन माहिती । harbhara basal dose niyojan ।
Автор: CropXpert India
Загружено: 2023-11-12
Просмотров: 994
Описание:
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
रब्बी हंगाम सुरु झाला आहे. राज्यामध्ये काही ठिकाणी हरभरा पेरणी देखील सुरु झालेल्या आहेत, यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बेसल डोस म्हणजेच खतांचे व्यवस्थापन तर हेच व्यवस्थापन कसे करावे याबाबत संपूर्ण माहिती आता आपण पाहणार आहोत.
नत्र
नत्र हे पिकाची वाढ करण्यात मदत करतं. हरभरा पीक हे वातावरणामधून देखील नत्र घेत असते त्यामुळे अतिशय कमी प्रमाणामध्ये नत्र खतांची आवश्यकता असते.
स्फुरद
स्फुरद हे पिकामध्ये फुटवे वाढवण्यासाठी मदत करणार आहे, तसेच सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुळांची देखील वाढ करण्यात मदत नक्कीच करणार आहे.
पोटॅश
पोटॅश हे दाण्यांची वाढ करण्यामध्ये आणि खोडाला आकार देण्यामध्ये फुटव्यांची जाडी होण्यामध्ये मदत करणार अहे परंतू कमी प्रमाणामध्ये याची गरज पिकाला अस्ते.
मायक्रोनुट्रीएंट
मायक्रोनुट्रीएंट हे खत पिकामध्ये सर्वांगीण विकासासाठी आणि तसेच पिकामध्ये जी खते आपण देत आहोत ती लवकर लागू करण्यासाठी आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करते.
सल्फर
सल्फर हे हरभरा पिकामध्ये देणे अत्यंत गरजेचे आहे. पिकामध्ये बुरशीनाशक म्हणून देखील काम करते, जमिनीमध्ये गरमी ठेवून वापसा अवस्थेमध्ये ठेवण्यात मदत करेल. ज्यामुळे फुटवे होण्यात देखील मदत मिळणार आहे.
खतांची मात्रा
1)
18:46:00 @50 किलो प्रति एकरी
म्युरेट ऑफ पोटॅश @15 किलो प्रति एकरी
बेनसल्फ @10 किलो प्रति एकरी
मायक्रोनुट्रीएंट @5 किलो प्रति एकरी
2)
24:24:00:08 @70 किलो प्रति एकरी
म्युरेट ऑफ पोटॅश @15 किलो प्रति एकरी
बेनसल्फ @5 किलो प्रति एकरी
मायक्रोनुट्रीएंट @5 किलो प्रति एकरी
3)
10:26:26 @70 किलो प्रति एकरी
बेनसल्फ @10 किलो प्रति एकरी
मायक्रोनुट्रीएंट @5 किलो प्रति एकरी
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.
तुमच्या शंका आणि प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी कमेंट मात्र नक्की करा.
आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका.
काही शेतीबद्दलची थोडक्यात माहिती पाहण्यासाठी आपल्या इंस्टग्राम पेजला भेट द्या.
लिंक :- https://instagram.com/shetkari_kida?i...
उत्पन्न तुमचे, मार्गदर्शन शेतकरी किड्याचे....!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: