या देशाच्या उन्नत माथा
Автор: Priyanka Dnyaneshwar Karanje
Загружено: 2019-08-14
Просмотров: 39510
Описание:
गायिका :- प्रियांका करंजे.
ढोलकी वादक :- ओंकार पोकळे.
मूळ कवी :- सचिन शिरसाठ.
: Lyrics :
या देशाचा उन्नत माथा उन्नत याची मान...
या देशामध्ये आम्ही जन्मलो हा आमुचा अभिमान....।।धृ.।।
धवल यशाचा उंच हिमालय नभ झाले ठेंगणे....
दूध आईचे पाजित सरिता इथे अखंडित पणे...
इथला वारा सदैव गातो संस्कृतीचे जयगान...
या देशामध्ये आम्ही जन्मलो हा आमुचा अभिमान....।।१।।
ईथे तृणाला देखील आहे तलवारीची धार....
माती पिकवी सुगंध तैसा धगधगता अंगार....
पर्वत रांगा उंच आमुच्या सामर्थ्याची शान....
या देशाचा उन्नत माथा उन्नत याची मान
या देशामध्ये आम्ही जन्मलो हा आमुचा अभिमान....।।२।।
भोगा वाचून त्यागावरती अपार आमुची प्रित....
तळ हातावर प्राण घेऊनी जगणे आमुची रित....
तरूण येथला देशासाठी रक्ताचा धनवान....
या देशाचा उन्नत माथा उन्नत याची मान
या देशामध्ये आम्ही जन्मलो हा आमुचा अभिमान....।।३।।
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: