Shingnapur Scam : आयुक्तांचं वेशांतर करुन 'स्टिंग ऑपरेशन'; लटकू हद्दपार होतील का?
Автор: Ahilyanagarlive24
Загружено: 2025-12-29
Просмотров: 26261
Описание:
जगप्रसिद्ध शनिशिंगणापूरच्या शनिमंदीरात झालेली स्मार्ट लुटमार विधानसभेत गाजली. बनावट अॅप, बनावट पावती पुस्तक, बनावट क्यू-आर कोड, हे सगळं जगासमोर आलं. बोगस कर्मचारी दाखवून येथे महिन्याला दानपेटीतून होणारी कोट्यवधींची लुटमार स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितली. पण आत्तापर्यंत काहीच हाती लागलं नाही. अहिल्यानगरच्या पोलिसांना फक्त दोन लुटारु कर्मचारी सापडले. डोंगर पोखरुन त्यांनी उंदीर पकडला. शनिभक्तांना फक्त नादी लावण्यात आलं. हे प्रकरण 100 टक्के दाबलं जातंय, याची आता शनिभक्तांना खात्री पटतेय. स्वतःला हिंदूत्ववादी म्हणविणारं, भाजप सरकारही हे गांभीर्याने घेत नाहीए, याचंच आश्चर्य वाटतंय. शनिशिंगणापूरला दोन पद्धतीने लुटमार होतेय. एक देवस्थानच्या आत, व दुसरी देवस्थानच्या परिसरात... शनिभक्त शिंगणापूरला येण्यापूर्वी त्यांची साडेसाती सुरु होते. आता ही दोन पद्धतीची लूटमार कोणती? याचा अनुभव प्रत्यक्ष नाशिकच्या विभागीय आयुक्तांनीही शनिवारी घेतला. 40-50 रुपयांचं पुजेचं ताट, येथील व्यावसायिकांनी आयुक्तांना 1100 रुपयांना दिलं. बरं, नुसतं दिलं नाही, तर अकराशे रुपये त्यांच्यांकडून वसूलही करण्यात आले. अर्थात, आयुक्तांनीही वेशांतर करुन हा सगळा प्रकार निमुटपणे घडू दिला. स्वतःची ओळख लपवून शनिशिंगणापूरात कशी लूट होते, याचा प्रत्यय त्यांना घ्यायचा होता. पण ही लूटमार एवढी भयंकर असेल, याची आयुक्तांनाच खात्री नव्हती. ती शनिवारी झाली. त्यानंतर त्यांनी तातडीने मॅरेथाँन मिटींग घेतल्या. देवस्थान कर्मचारी, प्रशासन, पोलिस, व्यावसायिक... अशा सगळ्यांनाच दम भरला. गेल्या 10-15 वर्षांपासून सुरु असणाऱ्या शनिभक्तांच्या त्रासाला, आत्ता कुठं वाचा फुटतेय. आयुक्तांना नेमकं कसं लुटलं गेलंय? शिंगणापूरमध्ये नेमकं काय चालतंय? साडेसाती घालवायला आलेल्यांना साडेसाती कशी लागतेय? हेच आपण या व्हिडीओतून पाहूयात...
गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर
बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : [email protected]
अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com
#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: