मुशी मसाला अश्या पद्धतीने बनवाल तर चिकन सुद्धा यापुढे फिक्के वाटेल | Mushi Fish Masala | Mori Fish
Автор: Kitchen 9 to 5 - Marathi
Загружено: 2022-11-07
Просмотров: 10475
Описание:
नमस्कार, एकदम सोप्प्या पद्धतीने मोरी माश्याच कालवण बनवण्या साठी विडिओ पूर्ण बघा.
Like Our Facebook Page:
/ kitchen_9to5-106651208681717
Follow Us On Instagram:
/ kitchen_9to5
Follow us on Twitter:
/ kitchen_9to5
जर तुम्हाला हि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ ला लाइक करा आणि आपल्या मित्र मंडळींसोबत शेअर करा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
अस्सल मालवणी पद्धतीचं मुशीत कालवण Recipe
Malvani Mushi Kalvan Recipe
Mori Fish Masala Recipe
साहित्य :
१. अर्धा किलो मुशी/ मोरी मासा
२. १०० ग्रॅम कांदे
३. ५० ग्रॅम किसलेलं ओल खोबर
४. ४ tbsp मालवणी मसाला
५. ७-८ कढीपत्ता
६. पाव कांदा फोडणीसाठी
७. ८-१० लहान कोकम
८. चवीनुसार मीठ
९. २ मध्यम बारीक चिरलेले टोमॅटो
कृती :
१. सर्वप्रथम मुशी स्वछ धुवून त्याला २ चमचे मालवणी मसाला लावून घेऊया.
२. आणि १ tbsp कोकम आगळ लावून मसाले मुरत ठेवायचे आहेत १५ मिनिटांसाठी.
३. वाटपासाठी १०० ग्रॅम कांदे आणि ५० ग्रॅम किसलेला ओल खोबर भाजून घ्यावं.
४. मिक्सर मध्ये भाजलेलं वाटप ३ लसूण पाकळ्या आणि २ tbsp मालवणी मसाला घालावा.
५. मिश्रण नीट बारीक करून घ्यावं.
६. फोडणीसाठी ३ -४ tbsp तेल घालून तेल गरम झाल्यावर त्यात ७-८ कढीपत्ता आणि पाव कांदा घालावा. कांदा लाल झाल्यानंतर २ मध्यम टोमॅटो घालून २-३ मिनिटं परतवून घ्यावे.
७. आता तयार केलेलं वाटप ह्या मध्ये घालून फक्त १-२ मिनिटं परतवून घ्यायचं. त्या नंतर मसाला लावून ठेवलेली मुशी ह्या मध्ये घालून मिक्स करून घ्यावं.
८. पाऊण ग्लास पाणी घालून थोडी ग्रेव्ही तयार करावी. ८-१० कोकम आणि चवीनुसार मीठ घालून कालवण ५-१० मिनिटांसाठी झाकून ठेवायचं.
९. कालवण चांगलं उकळलं कि कोथंबीर घालून सर्व्ह करावं.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
Chapters:
00:00 Introduction
00:30 मुशीला मॅरीनेट करणे
01:03 मुशीत वाटप तयार करणे
01:45 मुशीला फोडणी देणे
04:35 मुशी मसाला सर्व्ह करणे
-----------------------------------------------------------------------------------------------------------
#fish #shark #sharks #Sharkrecipe #mushimasala
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: